Success Story : पॉलीहाऊसमध्ये सेंद्रिय शेती; तोट्याच्या शेतीऐवजी शेतकऱ्याने फुलवली नफ्याची शेती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या बरेच शेतकरी पारंपरिक शेतीला (Success Story) बगल देत आधुनिक पद्धतीने पिकांची लागवड करत आहे. विशेष म्हणजे शेतकरी या पिकांतून मोठा नफा देखील कमावत आहे. पारंपारिक शेतीमध्ये पीक येण्यासाठी जास्त कालावधी लागतो. त्यातून उत्पन्नही कमी मिळते. मात्र, सध्या शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अल्पावधीतच अधिकचा नफा मिळवत आहे. हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथील एका शेतकऱ्याने देखील आपल्या ८ एकर जमिनीत सरकारी अनुदानाच्या मदतीने पॉलीहाऊस उभारले असून, त्यात ते मागणीनुसार सेंद्रिय पद्धतीने गहू, मोहरी तसेच भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत आहे. ज्यातून त्यांना लाखोंची कमाई (Success Story) होत आहे.

तेजेंद्र यादव असे या शेतकऱ्याचे नाव (Success Story) असून, त्यांची गुरुग्राम जिल्ह्यातील सराणा या गावात वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांचे कुटुंब पूर्वी रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करून धान आणि गहू हे पारंपरिक पिके घेत होते. मात्र त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या शेतीस आधुनिकतेची जोड देत सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारच्या योजनांचा आधार घेतल्याचे ते सांगतात.

कोणत्या पिकांची लागवड? (Success Story Of Organic Crops In Polyhouse)

त्यानुसार त्यांनी 2018 साली सर्वप्रथम पॉलीहाऊस उभारून, त्यात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला शेती व भरडधान्यांची शेती करण्यास सुरुवात केली. आरोग्याच्या दृष्टीने नागरिक जागरूक झाल्याने, त्यातून त्यांना दरही चांगला मिळू लागला आणि अधिक उत्पन्नही मिळू लागले. त्यामध्ये हळूहळू सुधारणा करत, सध्या ते आपल्या ८ एकर जमिनीमध्ये पॉलीहाऊसच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला, गहू व मोहरी पिकांचे उत्पादन घेत आहे. यासाठी त्यांनी वेळोवेळी सरकारी योजनांच्या माध्यमातून अनुदान मिळवल्याचेही ते सांगतात.

सेंद्रिय उत्पादनांची विक्री कुठे?

शेतकरी तेजेंद्र यादव यांच्या शेतीमध्ये जैविक पद्धतीने उत्पादित भाजीपाल्याला उच्चभ्रू लोकांमधून मोठी मागणी असल्याध्ये ते सांगतात. इतकेच नाही तर काही प्रमाणात उत्पादित भाजीपाला, गहू, मोहरी यांची विक्री राज्य सरकारच्या “माझे पीक माझे तपशील योजना” याद्वारे देखील करत आहे. ज्यातून आपल्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. तसेच सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने आपल्याला अधिक धावाधाव देखील करावी लागत नसल्याचे ते सांगतात.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सेंद्रिय पद्धतीने शेती करत अधिकचे उत्पन्न मिळवत असल्याने, त्यांनी प्रगतिशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. याशिवाय त्यांच्या आर्थिक उत्पन्नातच नाही तर जमिनीचा पोत सुधारण्यास देखील मदत झाली असल्याचे ते सांगतात. तसेच रासायनिक खतांवर होणार आपला भरमसाठ खर्च देखील कमी झाला असल्याचे ते शेवटी सांगतात.

error: Content is protected !!