Success Story : स्प्रिंकलरच्या मदतीने वाटाणा लागवड; उत्पादनवाढीसह शेतकऱ्याची भरघोस कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात प्रामुख्याने खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यात मोठ्या प्रमाणात (Success Story) वाटाणा लागवड केली जाते. वाटाण्याचा उपयोग दररोजच्या आहारात भाजी म्हणून केला जात असल्याने, त्याला बाजारात नेहमीच मागणी असते. ज्यामुळे पारंपरिक पिकांऐवजी सुधारित पद्धतीने वाटाणा लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता येतो. आज आपण अशाच एका प्रगतिशील शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. जे आपल्या शेतात आधुनिक पद्धतीने स्प्रिंकलरच्या मदतीने वाटाणा लागवड करत मोठा नफा मिळवत आहेत.

उत्पादनात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ (Success Story Of Pea Farming)

उत्तरप्रदेशातील हरदोई येथील प्रगतिशील शेतकरी रामशंकर कुशवाहा (Success Story) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते यापूर्वी आपल्या शेतात वाफा पद्धतीने पाणी भरून वाटाणा लागवड करत होते. मात्र त्यातून त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. यासाठी त्यांनी सरकारी अनुदान योजनेचा लाभ घेऊन, स्प्रिंकलर पद्धतीने वाटाणा लागवड करण्याचे निश्चित केले. विशेष म्हणजे त्यांना यात यश मिळाले असून, पाणी योग्य तितके दिले गेल्याने उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. स्प्रिंकलर पद्धतीमुळे त्यांना आपल्या उत्पादनात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ दिसून आली असल्याचे ते सांगतात.

किती मिळते उत्पन्न?

शेतकरी रामशंकर कुशवाहा यांनी सांगितले आहे की, शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर पद्धतीने वाटाणा लागवड केल्यास पाण्याची बचत तर होतेच. याशिवाय पिकाला योग्य प्रमाणात आणि नियमित पाणी मिळाल्याने उत्पादनात देखील मोठी वाढ होते. यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून 90 टक्के अनुदानावर ठिबक आणि स्प्रिंकलर पुरवले जाते. आपण याच सरकारी अनुदानाची मदत घेऊन आपल्या शेतात वाटाणा लागवड केली. शेतकरी रामशंकर कुशवाहा यांच्या म्हणण्यानुसार, वाटाणा लागवडीसाठी त्यांना दरवर्षी एकरी एकूण 40 से 50 हजार खर्च येतो. ज्यातून त्यांना एक एकरात खर्च वजा जाता अडीच ते तीन लाखांचा निव्वळ नफा मिळत आहे. ते आपल्या शेतात उत्पादित सर्व वाटाणा गोण्यांमध्ये भरून, हरदोई येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवतात.

आधुनिक शेतीकडे वळावे

शेतकरी रामशंकर सांगतात की, शेतकऱ्यांनी सध्या शेतीमध्ये कालानुरुप बदल करणे आवश्यक झाले आहे. अन्यथा अतिरिक्त खर्च करून त्यांना कमी उत्पन्न मिळू शकते. यापेक्षा शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत वाढीव उत्पादन घेऊन आपल्या एकरी उत्पन्नात वाढ करणे गरजेचे आहे. ठिबक किंवा स्प्रिंकलर पद्धती सारख्या आधुनिक पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे कष्ट तर कमी होतातच. पण त्यांना सन्मानजनक उतपन्न देखील मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक आधुनिक शेतीची कास धरावी, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

error: Content is protected !!