Success Story : कापसाने रडवले, लाल मिरचीने तारले; एकरी दीड लाखांचा नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Success Story) अपेक्षित दर मिळत नाहीये. वर्षभरापासून कापूस दर हमीभावापेक्षा कमी असल्याने, शेतकऱ्यांना बेभावात त्याची विक्री करावी लागत आहे. कापसाने यंदा शेतकऱ्यांची निराशा केली असून, अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. मात्र, आता यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कापूस पिकाचा नाद सोडत, लाल मिरचीची लागवड केली असून, त्यातून त्यांना एकरात दीड लाखांचा (Success Story) निव्वळ नफा मिळत आहे.

दीड लाखांचा निव्वळ नफा (Success Story Of Red Chilli Farming)

मनोज नंदूरकर असे या शेतकऱ्याचे (Success Story) नाव असून, ते यवतमाळ जिल्ह्यातील करंजी येथील रहिवासी आहेत. कापूस पिकामधून त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे मनोज यांनी पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच त्यांनी घराघरात वापरल्या जाणाऱ्या लाल मिरचीची लागवड केली. कापूस पिकाऐवजी लाल मिरची लागवडीचा त्यांचा हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला असून, यामधून त्यांनी एकरात दीड लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांना लाल मिरचीच्या लागवडीसाठी उत्पादन खर्चही कमी आला असल्याचे ते सांगतात.

मिरचीकडे का वळाले?

“बरीच वर्षे कापूस लागवड करत होतो. मात्र कापूस उत्पादन घेताना अनेक अडचणी आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती अनुभवली. गुलाबी बोंडअळी आणि इतर रोगांमुळे कापूस पिकातून नुकसानच अधिक व्हायचे. त्याला कधीच भावही मनासारखा भेटला नाही. मात्र, आता गेल्या काही वर्षांपासून लाल मिरचीची लागवड करत, मला चांगला नफा मिळत आहे. यंदा मिळणाऱ्या भावावर नफा अवलंबून असला तरी अंदाजे दीड लाख एकरी नफा मिळेल, असे शेतकरी मनोज नंदूरकर सांगतात. 6 ते 7 वर्षांपूर्वी सुरुवातीला 1 एकरवर मिरची लागवड केली. सर्व खर्च काढून लाखाहून अधिक नफा मिळताना दिसला. त्यामुळे मिरचीचे क्षेत्र वाढवून यावर्षी देखील त्यांनी 4 एकरवर मिरची लागवड केली आहे.

दरम्यान, लाल मिरचीची लागवड करताना उत्पादन खर्च कमी असला तरी त्यावरील रोगांवर विशेष लक्ष देण्याची गरज असते. अन्यथा पीक उत्पादनात घट होऊ शकते. थ्रिप्स रोगावर योग्य त्या उपाययोजना केल्यास चांगले उत्पन्न मिळते. शेतीत नवनवीन पिके घेतल्यास दर घसरणीचा फटका बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता पीक पद्धतीत बदल करण्याची गरज असल्याचे शेतकरी मनोज नंदूरकर सांगतात.

error: Content is protected !!