Success Story : दोन एकरात शेवगा लागवड; नांदेडच्या शेतकऱ्याने केली बक्कळ कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना (Success Story) फाटा देत, पीक पद्धतीमध्ये विविधता आणत आहे. विशेष म्हणजे पारंपारिक पिकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत शेतकऱ्यांना या नाविन्यपूर्ण पिकांच्या उत्पादनातून अधिकचा नफा देखील मिळत आहे. यात प्रामुख्याने वनस्पती पिकांच्या लागवडीकडे वळण्याचा शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. शेवगा हे पीक त्यापैकीच एक असून, सध्या अनेक शेतकरी शेवगा पिकाची लागवड करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने शेवग्याला बाजारात विशेष मागणी असते. ज्यामुळे त्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळतो. आज आपण अशाच एका शेवगा उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

पारंपारिक पिकांना फाटा (Success Story Of Shevga Cultivation)

शेतकरी नंदकुमार गायकवाड असे या शेतकऱ्याचे नाव (Success Story) असून, ते नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी गावचे रहिवासी आहे. शेतकरी नंदकुमार हे यापूर्वी पारंपारिक पिकांच्या माध्यमातून शेतीतून उत्पन्न घेत होते. मात्र, त्याद्वारे मिळणारे उत्पन्न खूपच अत्यल्प असल्याने, उत्पादन खर्चही मिळत नव्हता. ज्यामुळे त्यांना स्वतःचे घर चालवणे देखील कठीण जात होते. परिणामी, त्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी विचारांती शेवगा लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला.

किती मिळाले उत्पन्न?

शेतकरी नंदकुमार गायकवाड यांनी आपल्या दोन एकर शेतीमध्ये शेवगा लागवड केली आहे. लागवडीनंतर त्यांनी शेवग्याचे योग्य नियोजन केले आहे. शेवगा लागवडीसाठी त्यांना 55 हजारांचा खर्च आला आहे. दरम्यान, सध्या त्यांच्या शेतीमधील शेवगा शेंगा तोडणी सुरु आहे. सुरुवातीलाच गायकवाड यांना खर्च वजा जाता 2 लाख रुपयांचा नफा झाला आहे. आणखी त्यांची शेवगा बागेची शेंगा तोडणी सुरू असून, अजून त्यांना त्यातून 3 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पुढील पाच वर्षे या शेवगा लागवडीतून उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नगदी पिकांकडे वळण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांच्या मागे न लागता, अधिक नफा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांची निवड करावी. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, कमी पाण्यात अधिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीसह योग्य त्या पिकांची निवड केल्यास, त्यातून त्यांना मिळणारा नफा देखील अधिक मिळेल, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना शेवटी केले आहे.

error: Content is protected !!