Success Story : 2 एकरात वार्षिक 10 लाखांची कमाई; स्ट्रॉबेरी पिकातून शेतकऱ्याची कमाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी सध्या नगदी पिकांकडे (Success Story) वळत आहेत. ही पिके घेताना शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींचा मोठ्या प्रमाणात अवलंब करत आहे. ज्यामुळे त्यांना कमी कालावधीत येणाऱ्या पिकांमधुन मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळत आहेत. अशातच आता एका शेतकऱ्याने केवळ दोन एकर शेतीत स्ट्रॉबेरीची लागवड करत, वार्षिक 10 ते 12 लाखांची कमाई केल्याचे समोर आले आहे. आज आपण या शेतकऱ्याच्या स्ट्रॉबेरी शेतीची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

पुण्याहून केली रोपे उपलब्ध (Success Story Of Strawberry Farming)

दिनेश कुमार असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्याचे रहिवासी आहे. ते आपल्या खेड़ी गुज्जर या गावात यापूर्वी धान शेती करत होते. मात्र, त्यातून मिळणारे वार्षिक उत्पन्न (Success Story) खूपच कमी असल्याने दिनेश कुमार यांनी शेतीमध्ये काहीतरी वेगळा मार्ग निवडण्याचा मनी निर्धार केला. त्यातुन त्यांनी युट्युबचा आधार घेत स्ट्रॉबेरी पिकाची माहिती मिळवणे सुरु केले. सर्व माहिती मिळवल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील पुणे येथून रोपे उपलब्ध करत, अर्धा एकर शेतीत प्राथमिक टप्प्यात स्ट्रॉबेरी लागवड केली. त्यात त्यांना चांगले यश मिळाले. ज्यामुळे सध्या ते आपल्या दोन एकर शेतीमध्ये दरवर्षी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत आहेत.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी दिनेश कुमार सांगतात, यावर्षी सप्टेंबर महिन्यात दोन एकर शेतीमध्ये स्ट्रॉबेरी लागवड केली होती. सध्या आपल्या स्ट्रॉबेरी पिकाची काढणी सुरु आहे. साधारपणे सप्टेंबर अखेरची लागवड असल्याने डिसेंबरमध्ये फळ तोडणीला आली. मागील तीन महिन्यामध्ये आपल्या सर्व तोड्यांमधून दोन एकरात जवळपास 10 ते 12 लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे. आणखी एप्रिलच्या मध्यावधीपर्यंत आपला माल निघणार आहे. त्यामुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आपला सर्व माल आपण दिल्लीच्या आजादपुर बाजार समितीत पाठवतो. याशिवाय आपल्याला गुवाहटी आणि नागपुर येथील काही व्यापाऱ्यांच्या ऑर्डर येत असतात. त्यानुसार आपण आपला माल पॅकिंग करून पाठवतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

किती आला खर्च?

आपण स्ट्रॉबेरी लागवड करताना ठिबकसह मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. ठिबक, मल्चिंग पेपरचा खर्च धरून आपल्याला पहिल्या वर्षी दोन एकरात स्ट्रॉबेरी लागवड करण्यासाठी 4 ते 5 लाखांचा खर्च आला होता. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून ठिबकचा खर्च कमी होऊन, मल्चिंग आणि रोपांसाठी खर्च आला. त्यामुळे सध्या खर्च वजा जाता बाजाभावानुसार दोन एकरात वार्षिक 10 ते 12 लाखांची कमाई सहज होत आहे. असेही शेतकरी दिनेश कुमार सांगतात.

error: Content is protected !!