Success Story : मराठवाड्याच्या उष्ण पट्ट्यात फुलवली स्ट्रॉबेरी; करतोय लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अनेकदा शेती म्हटले की आतबट्यांचा धंदा, अशी ओरड होते. मात्र योग्य नियोजनातून (Success Story) पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिकतेची कास धरत चांगले उत्पन्न मिळवता येते. नांदेड जिल्ह्यातील बारड गावचे उच्चशिक्षित शेतकरी बालाजी उपवार यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. बालाजी हे गेल्या दोन वर्षांपासून स्ट्रॉबेरीची शेती करत असून, त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. स्ट्रॉबेरी हे थंड वातावरणातील पीक मानले जाते. मात्र बालाजी यांनी मराठवाड्यातील उष्ण वातावरणात दुसऱ्यांदा स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला आहे. आज आपण बालाजी यांच्या स्ट्रॉबेरी लागवडीची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

राज्यात सध्या अनेक उच्चशिक्षित (Success Story) तरुण शेतीमध्ये येत असून, नावीन्यपूर्ण पद्धतीने शेती करत आहेत. शेतकरी बालाजी यांनीही आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शेती करण्याचा निर्धार मनाशी बाळगत शेतीमध्ये नाविन्यता आणण्याचे ठरवले. त्यानुसार ते गेल्या दोन वर्षांपासून स्ट्रॉबेरीची लागवड करत असून, त्यांनी केवळ 10 गुंठे जमिनीमधून आणि तेही तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. स्ट्रॉबेरी पिकाचे माहेरघर असलेले महाबळेश्वर येथून त्यांनी रोपे उपलब्ध केली. नाभिला या जातीची रोपांची त्यांनी निवड केली असून, ते सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी लागवड केली आहे. यासाठी त्यांनी ठिबक आणि मल्चिंग पेपर पद्धतीचा वापर केला. त्यामुळे त्यांना कमी पाण्यामध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणे शक्य झाले.

कशी करतात विक्री? (Success Story Of Strawberry Farming)

शेतकरी बालाजी उपवार यांनी मागील वर्षीच्या अनुभव गाठीशी बांधत केवळ दोन ते अडीच महिन्यात आपल्या स्ट्रॉबेरीची काढणी सुरु केली. ते व्यापाऱ्यांना विक्री न करता आपल्या पिकाची विक्री थेट शेतकरी ते ग्राहक या पद्धतीने करत आहे. यासाठी ते नांदेडच्या शहरी भागांमध्ये स्टॉल लावत विक्री करत असून, काही प्रमाणात सोसाट्यांमध्ये जाऊन स्ट्रॉबेरीची विक्री करत आहे. शेतकरी ते ग्राहक या पद्धतीचा अवलंब केल्याने त्यातून त्यांना अधिकचा नफा देखील मिळत आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

ग्राहकांना नांदेड सारख्या उष्ण पट्ट्यात थंड वातावरणातील ताजी स्ट्रॉबेरी चाखायला मिळत असल्याने ग्राहक देखील मोठ्या संख्येने खरेदीवर तुटून पडत असल्याचे शेतकरी बालाजी सांगतात. त्यांच्या स्ट्रॉबेरीला सध्या नांदेडमध्ये 300 रूपये किलोचा दर मिळत आहे. ते आपल्या 10 गुंठे शेतीमध्ये रोज तोडणी करत, दैनंदिन 30 किलो स्ट्रॉबेरी विक्री करत आहे. त्यांच्या स्ट्रॉबेरीची काढणी ऐन भरात असून, त्यातून त्यांना आतापर्यंतचे उत्पन्न आणि सध्याच्या दरानुसार यावर्षीच्या हंगामात एकूण 5 ते 6 लाख रूपये रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!