Success Story : पोलीस भरतीत अपयश; तरुणाने फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा, करतोय बक्कळ कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतीमध्ये अनेक नवशिक्षीत तरुण पाऊल (Success Story) ठेवत आहे. आपल्या बद्धिमत्तेच्या जोरावर शेतीमध्ये पारंपरिक पिकांना मूठमाती देत नगदी पिकांच्या माध्यमातून अधिकचे उत्पन्न घेत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शेतकरी सुरेश गोरे या तरुणाने देखील असाच काहीसा प्रयत्न करत, दहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला आहे. इतकेच नाही तर अल्पावधीतच या तरुणाने स्ट्रॉबेरी पिकातून स्वतःची प्रगती साधत मोठी कमाई देखील केली आहे. आज आपण सुरेश गोरे याच्या स्ट्रॉबेरी शेतीची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

पोलीस दलात जाण्यासाठी प्रयत्न (Success Story Of Strawberry Farming)

सुरेश गोरे यांने ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतले असून, तो पोलीस दलात जाण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र त्यात त्याला यश (Success Story) आले नाही. मात्र सुरेश याने हिम्मत न हारता आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये करण्याचा ठरवला. शेतीमध्ये पदार्पण करताना त्याने पारंपरिक पिके घेण्याऐवजी नगदी पीक म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने नाबिला जातीची सात हजार स्ट्रॉबेरीची रोपे उपलब्ध केली. ही रोपे त्याने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आपल्या १० गुंठे शेतात चांगली मशागत करून घेतल्यानंतर लावली.

किती मिळतोय दर?

सुरेश गोरे याने स्ट्रॉबेरी लागवडीसाठी आपल्या १० गुंठ्यात एकूण ६० बेड तयार केले. त्यावर सिंचनसाठी ठिबक सिंचन पद्धतीची उभारणी केली. तसेच जैविक खते मिक्स करत लागवड केली. सध्या त्याच्या शेतातील स्ट्रॉबेरीची काढणी जोरात सुरु असून, त्याला चांगला दरही मिळतो आहे. सुरेश याच्या स्ट्रॉबेरीला गोडवा आणि लालचुटुकपणा अधिक असल्याने, हातोहात विक्री होत असून सरासरी २०० पासून ४०० रुपये किलोपर्यंत दर मिळत असल्याचे तो सांगतो.

किती आला खर्च?

शेतकरी सुरेश गोरे यांना आपल्या १० गुंठयात स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी एकूण दोन ते अडीच लाख रुपये खर्च आल्याचे ते सांगतात. यामध्ये रोपांसाठी १ लाख १० हजार रुपये, खतांसाठी ३० हजार रुपये, लागवड व मशागतीसाठी १० हजार रुपये, औषधांवर ४० हजार रुपये व इतर खर्च जवळपास ५० हजार रुपये आला. असा एकूण जवळपास दोन ते अडीच लाख रुपये खर्च आल्याचे ते सांगतात.

किती मिळाले उत्पन्न?

सध्या त्यांच्या शेतातून स्ट्रॉबेरीची काढणी सुरु असून, दोन दिवसातून एकदा ६० ते ७० किलो स्ट्रॉबेरी बाजारात पाठवली जात आहे. शेतकरी सुरेश गोरे आपली स्ट्रॉबेरी स्टॉल लावून विक्री करत आहे. तर काही स्ट्रॉबेरी ते थेट ग्राहकांना विक्री करत आहेत. सध्या २०० रुपये प्रति किलो विक्रीप्रमाणे म्हटले तरी त्यांना आतापर्यंत मिळालेले उत्पन्न आणि एकूण स्ट्रॉबेरीतुन १० गुंठ्यात एकत्रितपणे सहा लाखांपर्यंत उत्पन्न मिळण्याचे अपेक्षा असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!