Success Story : उसाचे एकरी 138 टन उत्पादन, 40 ते 45 कांडी; पुण्याच्या शेतकऱ्याची कमाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस शेती म्हटले बारमाही पाणी आणि योग्य नियोजन गरजेचे असते. मात्र हेच नियोजन योग्य रीतीने करत (Success Story) पुण्यातील सोनकसवाडी येथील शेतकरी संजय जगताप यांनी एकरी 138 टन उसाचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे जगताप यांच्या या उसाची सर्वदूर चर्चा सुरु आहे. खुद्द देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांना देखील जगताप यांच्या या उसाची भुरळ पडली असून, पवार यांनी शेतकरी संजय जगताप यांच्या बांधावर जाऊन (Success Story) त्यांना कौतुकाची थाप दिली आहे.

माळेगाव कारखान्याचे सभासद असलेले अँड. संजय जगताप (Success Story) यांची पणदरे भागातील सोनकसवाडी येथे शेती आहे. जगताप हे यापूर्वी केळीची शेती करत होते. मात्र त्यांनी केळीची बाग काढत त्याच शेतात 86032 या उसाची जातीची 4200 रोपे लावली. हे रोपे त्यांनी सांगली येथून उपलब्ध केली. प्रत्येक रोपामध्ये दीड फुटाचे अंतर ठेवले. उसाची बांधणी, तगारणी यासाठी योग्य नियोजन केले. ऊस 10 ते 12 कांड्यांवर आणि 20 ते 22 कांड्यांचा झाल्यावर अशा दोन वेळा उसाचे पाचट काढले. त्यांनतर ऊस 40 ते 45 कांड्यांचा झाल्यावर त्यांनी तो कारखान्याला तोडणीसाठी दिला. हा ऊस त्यांनी ठिबक पद्धतीने लागवड केलेला होता. यामुळे उसाच्या पिकाची चांगली जोमदार वाढ झाली. उसाचे त्यांनी एकरी तब्बल 138 टन एवढे दर्जेदार उत्पादन मिळवले आहे.

40 ते 45 कांड्यांपर्यंत ऊस (Success Story Of Sugarcane Farmer)

संजय जगताप यांनी ऊस रोपे लावल्यानंतर त्यांची उगवणी झाल्यावर दर्जेदार खते वापरली. याशिवाय जगताप यांनी योग्य वेळी तगारणी केल्यावर रासायनिक खते, ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी व खते दिली. तसेच, रोपांना योग्य सूर्यप्रकाश व खेळती हवा मिळाल्याने उसाच्या कांड्यांची वाढ चांगली झाली. असे आवर्जून सांगतात. त्यामुळे आपला ऊस 40 ते 45 कांड्यांपर्यंत परिपक्व तयार झाल्याचे जगताप सांगतात.

यशस्वी प्रयोगाचे प्रशस्तीपत्र

ऍडव्होकेट संजय जगताप हे पुण्यातील निष्णात वकील असून, त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे विक्रमी उत्पादन घेतले आहे. संजय जगताप सांगतात. इच्छाशक्तीच्या जोरावर ऍड. संजय जगताप व त्यांचे कुटुंबीय यांनी ऊस उत्पादनात माळेगाव कार्यक्षेत्रात इतिहास घडवला. त्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे त्यांचे माळेगाव कारखान्याच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले. याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनांचा वर्षाव करण्यात येत आहे.

error: Content is protected !!