हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मका लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात (Success Story) आहे. प्रामुख्याने मका या पिकाला शेतकऱ्यांचे ‘पिवळे सोने’ देखील म्हटले जाते. त्यातच यंदा इथेनॉल निर्मितीसह पोल्ट्री उद्योगासाठी मकाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्यामुळे मका पिकाला यंदा बाजारभाव देखील चांगला मिळत आहे. इतकेच नाही तर मागील सलग तीन वर्षांपासून मका पिकाला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. याशिवाय जनावरांना मकामुळे चारा देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. परिणामी, शेतकऱ्यांचा मका पिकाकडे ओढा वाढला आहे. आज आपण अशाच एका उन्हाळी मकाचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.
ठिबक, बेड पद्धतीचा अवलंब (Success Story Of Maize Farming)
प्रदीप कुमार असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील मुसापुर गावचे रहिवासी आहेत. प्रदीप यांनी यंदाच्या उन्हाळी हंगामात आपल्या एक हेक्टर जमिनीमध्ये उन्हाळी मका लागवड (Success Story) केली होती. यासाठी त्यांनी ठिबक आणि बेड पद्धतीचा अवलंब केला होता. ज्यामुळे त्यांना कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळवण्यास मदत झाली आहे. उन्हाळ्यात आपल्याकडे पाण्याची कमतरता जाणवू शकते. हे लक्षात घेऊन त्यांनी रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून पाण्याचे काटेकोर नियोजन केलेले होते. ज्याचा त्यांना पीकवाढीच्या प्रत्येक टप्प्यात वेळोवेळी पाण्याची पूर्तता होण्यास मदत झाल्याचे ते सांगतात.
किती मिळाले उत्पादन?
शेतकरी प्रदीप कुमार सांगतात, आपण मागील काही वर्षांपासून नियमित रब्बी हंगामात मका पिकाची लागवड करत आहोत. ज्यात मका पिकाच्या वाढीदरम्यान आपण वेळोवेळी त्यास ठिबकच्या माध्यमातून खते आणि सूक्ष्मअन्नद्रव्ये दिली. ज्यामुळे यंदा आपल्याला एक हेक्टरमध्ये 112 क्विंटल मका उत्पादन मिळण्यास मदत झाली आहे. मागील वर्षी याच एक हेक्टर जमिनीमध्ये आपल्याला 98 क्विंटल इतके उत्पादन मिळाले होते.
किती मिळाला नफा?
यंदाच्या उन्हाळी हंगामात आपल्याला मका पिकाला 2150 रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. शेतातील मका काढणीनंतर तात्काळ बाजारात नेल्याने दर कमी मिळाला. मात्र, आपल्याला एकूण एक हेक्टर मका पिकातून बियाणे, खते, मशागत खर्च, काढणी खर्च असा सर्व खर्च वजा जाता 1 लाख 58 हजार 500 रुपये इतका निव्वळ नफा (Success Story) मिळाला आहे. प्रामुख्याने यंदा बाजारभाव चांगला असल्याने मका पिकातून चांगले उत्पन्न मिळाल्याचे शेतकरी प्रदीप कुमार यांनी म्हटले आहे.
आधुनिकितेकडे वळण्याची गरज
दरम्यान, गेली काही वर्ष कटिहार, समस्तीपुर या जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने मका पिकाकडे वळले आहे. विशेष म्हणजे पाण्याच्या उपलब्धतेबाबत जागरूकता निर्माण शेतकरी मका पिकासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सर्वच पिकांची लागवड कमी पाण्यात कशी करता? आणि त्यातून अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल? यावर भर देण्याची गरज आहे. असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.