Success Story : शेळीपालनातून कमावले 5 कोटी रुपयांचे उत्पन्न, तेजस लेंगरे यांची यशोगाथा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : सांगली जिल्ह्यातील बामणी (ता. खानापूर) येथील तेजस लेंगरे यांनी शेळीपालन व्यवसायातून पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांची यशोगाथा पाहूया. तेजस लेंगरे यांनी सन २००६ पासून शेळी पालन (Goat farm Business) सुरुवात केली. त्यांच्याकडे उस्मानाबादी जातीच्या ७ ते ८ शेळ्या होत्या. त्यामध्ये आफ्रिकन बोर जातीची एक शेळी आणि बोकड घेऊन शेळीपालनाला सुरुवात केली. तेजस लेंगरे यांनी २०१३ साली शेड बांधले. त्यावेळी त्यांना शेड बांधण्यासाठी २३ लाख रुपये इतका खर्च आला. शेळ्यांच्या शेडमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कंपार्टमेंट केले आहेत.

दैनंदिन कामाचे स्वरूप कसे असते?

दररोज सकाळी सात वाजता गोठ्याची स्वच्छता केली जाते. नंतर दहा वाजेपर्यंत शेळ्यांना चारा टाकला जातो. चार्‍यामध्ये दशरथ गवत, मेथी घास, तुती, हादगा आदी गवताचा समावेश असतो. पाण्याच्या माध्यमातून कोणताही आजार होऊ नये, यासाठी शेळ्यांना निर्जंतुक करून पाणी दिले जाते. तसेच पौष्टिक चारा दिला जातो.

नवीन शेळी पालकांनी काय करावे?

शेळीपालन करण्यासाठी अगोदर प्रशिक्षण घेतले पाहिजे. तसेच जास्तीत जास्त १० ते २० शेळ्यांपासून शेळीपालनाची सुरुवात केली पाहिजे. शेळ्यांच्या आजार, चारा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन स्वच्छता बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शेळीपालनातील बारकावे सुरुवातीला समजून घेणे महत्त्वाचे आहेत.

Tejas Lengare Goat Farm Video

लेंडीपासून गांडूळखत बनवण्याचा प्रयोग

२०१३ पासून तेजस लेंगरे यांनी शेळ्यांच्या लेंडीपासून गांडूळ खत बनवण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांना यश आले. तेजस लेंगरे हे जवळपास १७ ते १८ वर्षापासून शेळी पालन करत आहेत. व्यवसायाकडे चांगले लक्ष असल्यामुळे तोटा कधी झालाच नाही, असे तेजस लेंगरे सांगतात. सध्या लेंगरे यांच्याकडे साडेतीनशे शेळ्या आहेत. शेळ्यांसाठी वीस एकर क्षेत्रावर ते चारा लागवड करत असतात.

शेळ्यांची विक्री

तेजस लेंगरे अडीच हजार रुपये प्रति किलो प्रमाणे उत्पादनासाठी शेळीची विक्री करतात. नराची विक्री एक हजार रुपये प्रति किलो प्रमाणे करतात. शेळी व बोकड विक्रीतून त्यांना खर्च वजा जाता एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.

error: Content is protected !!