Success Story : एकरात 250 क्विंटल टरबूज उत्पादन; बीडच्या शेतकऱ्याची अडीच लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांची संख्या (Success Story) दिवसेंदिवस वाढत आहे. कधी दुष्काळ, कधी अवर्षण तर कधी पावसाचा खंड यामुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी मागे काहीही शिल्लक राहत नाही. मात्र, अशा परिस्थितीतही सध्या काही शेतकरी शेतीमध्ये आधुनिक साधनांच्या मदतीने शेतीमध्ये क्रांती घडवून आणत आहे. यासोबत आपल्याकडील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून, शेतीमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. ज्यांनी उन्हाळी हंगामात टरबूज पिकातून केवळ दोन-तीन महिन्यामध्ये अडीच लाखांची कमाई केली आहे.

कमी पाण्यात अधिक उत्पादन (Success Story Of Watermelon Farming)

अशोक भांगे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याच्या छोटीवाडी गावातील रहिवासी आहे. मराठवाडा म्हटले की नेहमीच दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, याच भागात अशोक भांगे या शेतकऱ्याने शेतीमध्ये क्रांती (Success Story) घडवून आणली आहे. त्यांनी आपल्याकडील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले. तसेच उन्हाळी टरबूज लागवडीसाठी त्यांनी ठिबक व मल्चिंग पेपर व्यवस्था उभारली. त्यातून त्यांना कमी पाण्यात अधिक उत्पादन घेणे शक्य झाले आहे.

किती मिळाले उत्पन्न?

शेतकरी अशोक भांगे सांगतात, “आपण जानेवारी महिन्याच्या शेवटी एका एकरात हायब्रीड बियाणे वापरून टरबूज पिकाची लागवड केली होती. त्यानंतर केवळ सव्वा दोन महिन्यामध्ये आपले पीक तोडणीला आले. त्यातून आपल्याला जवळपास एकरात 250 क्विंटल इतके टरबुजाचे भरघोस उत्पादन मिळाले आहे. या आपल्या उत्पादित टरबुजाला एक हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. ज्यातून आपल्याला एकरात एकूण अडीच लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.”

आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज

दरम्यान, शेतकऱ्यांनी परिस्थितीला दोष न देता, आहे त्या परिस्थितीत सर्वोत्तम उत्पादन कसे मिळवता येईल. यासाठी प्रयत्न करायला हवेत. याशिवाय पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने शेती केल्यास, त्यातून मिळणारा परतावा हा देखील अधिकच मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिबक सारख्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. तसेच त्या माध्यमातून नगदी पिकांच्या मदतीने अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होते, असे आवाहनही त्यांनी शेवटी शेतकऱ्यांना केला आहे.

error: Content is protected !!