Success Story : साडेतीन एकरात टरबूज लागवड; अवघ्या 2 महिन्यात मिळवले 8 लाखांचे उत्पन्न!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे शेती व्यवसायात खूपच अनिश्चितता आली आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित उत्पादन (Success Story) मिळत नाही. यामुळे अनेक शेतकरी पुत्रांनी आता शेतीकडे पाठ फिरवली असून, दुसऱ्या उद्योगधंद्यांमध्ये आपले नशीब आजमावायला सुरुवात केली आहे. तथापि आजही असे अनेक तरुण आहेत जे की काळ्या आईशी इमान राखत शेती करत आहे. फक्त शेतीच करत आहेत असे नाही तर शेतीमधून लाखो रुपयांची कमाई (Success Story) देखील करत आहेत.

दुष्काळातही उत्तुंग भरारी (Success Story Of Watermelon Farming)

आज आपण धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बेहेड विठाई परिसरातील शेतकरी विशाल दिलीप खैरनार यांची यशोगाथा पाहणार आहोत. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने दुष्काळाचे सावट असतानाही लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. शेतकरी विशाल दिलीप खैरनार यांनी साडेतीन एकर जमिनीत टरबूज लागवड करून, साडेआठ लाख रुपयांची कमाई केली आहे.

टँकरच्या पाण्याद्वारे विक्रमी उत्पादन

खरे तर साक्री तालुक्यातील हा भाग दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे तर येथे पाण्याची भीषण परिस्थिती तयार झाली आहे. मात्र पाण्याची टंचाई असताना देखील विशाल यांनी टरबूज पिकातून चांगली कमाई करून दाखवली आहे. टरबूज पिकासाठी त्यांनी टँकरने पाणी देत विक्रमी उत्पादन मिळवले आहे. विशाल सांगतात, त्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साडेतीन एकर जमिनीवर बाहुबली, जिग्ना गोल्ड व अजित सीड्सचे हायब्रिक्स या तीन वाणाच्या टरबुजाची लागवड केली.

80 टन टरबूज उत्पादन

टरबूज लागवड केली मात्र लागवडीनंतर एका महिन्यातच पिकाला पाणी कमी पडू लागले. यामुळे त्यांना टँकरने पाणी द्यावे लागले. त्यांनी जवळपास दीड महिने पिकाला टँकरने पाणी दिले. यासाठी त्यांनी दोन लाख रुपयांचा खर्च केला. तसेच औषध, खते, बी-बियाणे यासाठी त्यांना आणखी 3 लाख रुपयाचा खर्च आला. मात्र, साडेतीन एकर जमिनीतून त्यांना 80 टन टरबूज मिळाले आहे. विशेष म्हणजे एका टरबूजचे वजन आठ किलोपर्यंत भरले आहे. यातून त्यांना आठ लाख 40 हजार रुपयांची कमाई झाली असून, खर्च वजा करता त्यांना एकरी एक लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळाला आहे.

error: Content is protected !!