Success Story : दीड बिघ्यात टरबूज शेती; तीन महिन्यात शेतकऱ्याला 1,80,000 रुपयांचा नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अतोनात कष्ट करणे (Success Story) हा गुण शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये उजपतच आलेला असतो. त्यातच सध्या शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. याच आधुनिक तंत्रज्ञान आणि कष्टाच्या जोरावर सध्या अनेक तरुण शेतकरी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहे. आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने दीड बिघा जमिनीमध्ये केवळ दोन ते तीन महिन्यांमध्ये टरबुज लागवडीतून 1 लाख 80 हजारांचा निव्वळ नफा (Success Story) मिळाला आहे.

दीड बिघ्यात 5400 रोपे (Success Story Of Watermelon Farming)

शंकर निकम असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, तो कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव गावचा रहिवासी आहे. शेतकरी शंकर निकम याने आपल्या दीड बिघा रानामध्ये ठिबक सिंचन पद्धतीने उन्हाळी टरबुजाची लागवड (Success Story) केली होती. त्याने दीड बिघ्यात टरबूजाची 5400 रोपे लावली. यासाठी त्याने यंदाची पाणी कमी असण्याची परिस्थिती लक्षात घेता आगाऊ टरबूज लागवड केली. दीड बिघे रानात ड्रीप उभारले, मल्चिंग पेपरचा वापर केला. तसेच वेळोवेळी सूक्ष्म अन्नद्रव्ये, खते ड्रीपमधून पिकांनी दिली. याशिवाय वेळोवेळी औषध फवारणी घेतली.

किती मिळाले उत्पन्न?

आज शेतकरी शंकर निकम यांच्या शेतातील टरबूज पिकाची तोडणी सुरु असून, त्यांनी आतापर्यंत आपल्या दीड बिघे रानात एकूण 23 टन कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. ज्यातून त्यांना आतापर्यंतच्या तोडणीतून दोन लाख बहात्तर हजार उत्पन्न मिळाले आहे. ज्यातून 92 हजार रुपये इतका खर्च वजा करता, त्यांना एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये एवढा निव्वळ नफा मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शेतात आणखी टरबूज तोडणी सुरु असून, त्यांना मागे शिल्लक असलेल्या काही टरबूजाच्या माध्यमातून उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘शेतकऱ्यांनी आधुनितेकडे वळावे’

शेतकरी शंकर निकम सांगतात, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची (Success Story) जोड दिल्यास, त्यातून कमी कष्टात कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होते. यासाठी बियाणे निवडीपासून, नर्सरीतील रोपे खरेदी करण्यापासून शेतकऱ्यांनी सजग असले पाहिजे. कारण, कोणत्याही पिकाचे अधिक उत्पन्न मिळण्यात योग्य बियाण्याची निवड, योग्य पीक व्यवस्थापन, पिकासाठी गरजेनुसार आधुनिक साधनांचा वापर करणे. खूप गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांनी पीक घेताना आधुनिक पद्धतींचा अवलंब करावा, असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!