Success Story : टरबूज पिकात मिरचीचे आंतरपीक; कमी पाण्यात शेतकऱ्याची लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याचे (Success Story) तुम्ही सर्वत्र ऐकले असेल. खरेतर ही वास्तविकता आहे. शेतीमधून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले तर बाजारात मालाला भाव मिळत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे. यामुळे अनेक जण शेती व्यवसायापासून दूर जात आहे. मात्र अनेक जण आजही नैसर्गिक आणि सुलतानी संकटांचा सामना करत शेती करत आहेत. विशेष म्हणजे नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून या व्यवसायातून लाखोंची (Success Story) कमाई करत आहे.

मिरचीचे आंतरपीक (Success Story Of Watermelon Farming)

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने टरबूज पिकात (Success Story) मिरचीचे आंतरपीक घेतले असून, या शेतकऱ्याला लाखो रुपयांची कमाई होणार आहे. बापू आनंदराव पऱ्हाड असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. बापू सांगतात, त्यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वी टरबूज लागवड केली होती. दिड एकरात टरबूज लागवड केली आणि यानंतर त्यांनी याच पिकात मिरचीची आंतरपीक म्हणून लागवड केली.

आधुनिक साधनांचा वापर

टरबूज लागवडीसाठी त्यांनी बेड तयार केलेत आणि बेडवर मल्चिंग पेपर टाकून याची लागवड केली. टरबूज पिकाला पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. यामुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करता आले शिवाय कमी पाण्यात त्यांना पीक घेता येणे शक्य झाले. विशेष म्हणजे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी विद्राव्य खतांची देखील पूर्तता केली. यामुळे 60 दिवसांच्या कालावधीत अर्थातच दोन महिन्यात त्यांना टरबूजच्या पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळाले आहे.

35 ते 40 टन कलिंगड उत्पादन

सध्या उष्णता प्रचंड वाढली असून, यामुळे बाजारात टरबूजला मोठी मागणी आली आहे. यामुळे प्रति दहा किलो 1100 ते 1200 या दरात टरबूजची विक्री केली जात आहे. त्यांना दीड एकर जमिनीतून 35 ते 40 टन एवढे टरबूजचे उत्पादन मिळणार असून यातून त्यांना जवळपास चार लाख रुपयांची कमाई होणार आहे.

विशेष बाब अशी की टरबूज पिकात लागवड केलेल्या मिरचीतून त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. यामुळे कमाईचा हा आकडा आगामी काळात आणखी वाढणार आहे. निश्चितच बापू यांनी शेतीमध्ये केलेला हा प्रयोग त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून यामुळे त्यांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे. या कामी बापू यांना त्यांच्या पत्नीने देखील मोलाची साथ दिली आहे.

error: Content is protected !!