Success Story : पूसा ‘एचडी 3386’ वाण पेरले; शेतकऱ्याने घेतले एकरी 34 क्विंटल गहू उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला गहू काढणी हंगाम अंतिम टप्प्यात (Success Story) असून, राज्यात बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू उत्पादन होते. विशेषतः गोदावरीच्या खोऱ्यातील नाशिक, औरंगाबाद, जालना आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये गहू लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रति एकरी गहू उत्पादन मिळवतात. आज आपण अशाच एका गहू उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी प्रति एकरी विक्रमी 34.4 क्विंटल उत्पादन (Success Story) मिळवले असून, त्यांची सध्या सर्वदूर चर्चा होत आहे.

‘एचडी 3386’ वाणाची पेरणी (Success Story of Wheat Farming)

सुधीर अग्रवाल असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील भूरेका गावचे रहिवासी आहेत. त्यांनी यावर्षी आपल्या शेतीमध्ये एचडी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या पूसा ‘एचडी 3386’ या वाणाची पेरणी केली होती. विशेष म्हणजे शेतकरी सुधीर अग्रवाल हे केवळ प्रगतिशील शेतकरी (Success Story) नसून, ते बियाणेनिर्मिती व्यवसायामध्ये देखील एक महत्वाची भूमिका बजावते आहेत. ज्यामुळे सध्या ते आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत.

एकरी 34.4 क्विंटल उत्पादन

सुधीर अग्रवाल सांगतात, आपण गहू पिकासह दरवर्षी मोहरी आणि बटाटा या पिकांचे उत्पादन घेतो. याशिवाय ते पिकांच्या विविध जातींचे स्वतः बियाणे उत्पादन देखील करत आहे. यंदाच्या वर्षी भारतीय कृषी संशोधन संस्थेने पूसा ‘एचडी 3386’ हे वाण विकसित केले असून, शेतकरी सुधीर अग्रवाल यांनी पहिल्याच वर्षी या वाणाचे उत्पादन घेतले असून, नुकतीच 5 एप्रिल 2024 रोजी त्यांच्या गव्हाची काढणी (हार्वेस्टिंग) करण्यात आली आहे. ज्यात त्यांना या नवीन वाणाच्या मदतीने प्रति एकरी 34.4 क्विंटल उत्पादन मिळाले आहे.

उशिरा पेरणीमुळे फटका

शेतकरी सुधीर अग्रवाल सांगतात, गहू पेरणी ही वेळेत होणे गरजेची असते. मात्र, यंदा आपण गहू हा उशिरा पेरला होता. ज्यामुळे आपल्याला उत्पादन घटीचा सामना करावा लागला आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या म्हणण्यानुसार पूसा ‘एचडी 3386’ या वाणाची प्रति उत्पादनक्षमता ही प्रति एकरी उत्पादन क्षमता ही प्रति एकरी 40 क्विंटल इतकी आहे. मात्र, आपण उशिरा पेरणी केल्याने आपल्याला उत्पादनात फटका बसला आहे.

केला नॅनो युरियाचा वापर

‘एचडी 3386’ या वाणाची पेरणी केल्यानंतर आपण पीक जोमात असताना, नॅनो युरियाचा वापर केलेला होता. त्यानंतर पीक 70 दिवसांचे झाल्यानंतर त्यास 53:35:0 एनपीके हे खत वापरले होते. याशिवाय आपल्याला अगदी जमिनीच्या मशागतीपासून ते गहू काढणीसाठी एक एकराला 7200 रुपये इतका आला आहे. तर त्याच एकरातून आपल्याला 34.4 क्विंटल उत्पादन गहू उत्पादन मिळाले आहे.

error: Content is protected !!