हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकऱ्यांना आपल्या मालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत (Success Story) योग्य दर मिळत नाही. त्यातच अवकाळी पाऊस किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास पीक पूर्ण हातातून जाते. मात्र अशा काळात कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न देणारी ‘सफेद चंदन शेती’ (Success Story) शेतकऱ्यांना तारू शकते. याच पार्श्वभूमीवर आज आपण एका चंदन शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत.
उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील शेतकरी (Success Story) अविनाश कुमार यादव वर्ष 2012 पासून सफेद चंदनाची शेती करत आहे. येत्या 10 वर्षांमध्ये त्यापासून करोडो रुपयांचे उत्पन्न होणार असल्याची त्यांना अपेक्षा आहे. त्यांचे अनुकरण करत जिल्ह्यातील अनेक शेतकरी सध्या चंदन शेतीकडे वळाले आहेत. 2012 मध्ये चंदन शेती करण्याचा विचार मनात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम 5 ते 7 रोपांची प्रायोगिक तत्वावर लागवड केली. या चंदनाच्या झाडांची वाढ चांगल्या रीतीने झाली. त्यामुळे त्यांनी 2017-18 मध्ये कर्नाटक येथून 50 सफेद चंदनाची रोपे उपलब्ध केली. त्यानंतर त्यांनी हळूहळू रोपांची संख्या वाढवली. त्यासाठी त्यांना प्रति रोपास 200 रुपये खर्च आला. सध्या त्यांची झाडे मध्यम अवस्थेत असल्याचे ते सांगतात.
किती कालावधी लागतो? (Success Story Of Sandalwood Farming)
अविनाश सांगतात, “सफेद चंदन शेतीसाठी सुरुवातीला एक वर्ष काळजी घ्यावी लागते. त्यानंतर त्याकडे बघण्याची आवश्यकता नसते. चंदनाची लागवड ही मुख्यतः माळरान जमिनीवर देखील केली जाऊ शकते. त्यासाठी पाण्याचीही जास्त आवश्यकता नसते. सफेद चंदनाची उंची 18 ते 25 फूट इतकी असते. आणि झाडे लागवडीपासून ते कापणीपर्यंत पूर्ण 12-15 वर्षांचा कालावधी लागतो. सफेद चंदन लागवडीनंतर त्यात तूर पीक घेतल्यास, झाडांची वाढही जलद गतीने होते. आणि तूर पिकातून आपल्याला उत्पन्नही मिळते. तूर पिकामुळे चंदनाच्या झाडास नायट्रोजनची उपलब्धता मिळते. याशिवाय खोडामध्ये सुगंधित तेलाचा अंश वाढण्यासही मदत होते.”
एकरी खर्च किती?
सफेद चंदनाचा उपयोग औषधे बनविण्यासाठी, साबण, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती, कंठीमाळ, फर्निचर, लाकडी खेळणी, धार्मिक पूजा यामध्ये होतो. तसेच चंदनाला विदेशात मोठ्या प्रमाणात मागणीही असते, असे ते सांगतात. अविनाश यांच्या मते, “एका एकरात चंदनाची 500 रोपे लागतात. दोन झाडांमध्ये कमीत कमी 10 फूट अंतर असावे. एक एकर चंदन लागवडीसाठी जवळपास 1 लाख रुपयांचा खर्च येतो. तर 12 ते 15 वर्षांच्या कालावधीनंतर त्यापासून बिना कोणत्याही कष्टामध्ये मोठे उत्पन्न मिळते. चंदनाच्या लाकडाला बाजारात 10 ते 15 हजार रुपये प्रति किलोचा दर मिळतो.”
वनविभागाची परवानगी आवश्यक
आपल्या सर्व झाडांपासून आपल्याला काही वर्षांमध्ये 1 कोटी 90 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. असे सांगतात. चंदन शेतीसाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागत नाही. मात्र, ज्या पद्धतीने कोणत्याही झाडाची तोडणी करण्याअगोदर वनविभागाची परवानगी काढावी लागते. त्याच पद्धतीने आपली झाडे कापणीला आल्यानंतर शेवटच्या टप्प्यात वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. असे ते सांगतात.