Success Story : साताऱ्यात पांढऱ्या स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड; देशातील पहिलाच प्रयोग!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : स्ट्रॉबेरी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर लालबुंद रंगाच्या रसाळ स्ट्रॉबेरीचे (Success Story) चित्र उभे राहते. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी विशेष प्रसिद्ध असून, राज्यात सध्या अनेक भागात शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करताना दिसून येत आहे. मात्र आता सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एका तरूणाने पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. विशेष म्हणजे पांढऱ्या स्ट्रॉबेरीचा हा देशातील पहिलाच प्रयोग असून, या तरुणाने त्यातून यशस्वी उत्पादन (Success Story) घेतले आहे.

बाजारानुसार पिकाची निवड (Success Story of White Strawberry)

उमेश खामकर असे या प्रगतिशील शेतकऱ्याचे (Success Story) नाव असून, त्याने आपल्या अर्धा एकर जमिनीमध्ये या पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. जिल्ह्यात सर्वच शेतकरी लाल स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतात. हे पाहून उमेश याने काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने शेतात काय पिकतं, यापेक्षा बाजारात काय विकतं, असा विचार करून पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली. आणि त्यात त्याला यशही मिळाले. बाजाराचा अंदाज घेऊन त्या पद्धतीने पीक घेतले की त्यातून नक्कीच फायदा असल्याचे उमेश सांगतो.

किती मिळतोय दर?

नोव्हेंबर 20234 मध्ये उमेश याने फ्लोरिडा पर्ल प्रजातीच्या पांढऱ्या स्ट्रॉबेरीची दहा हजार रोपे उपलब्ध करून, ती आपल्या एक बिघाभर रानात लावली. जवळपास दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीनंतर सध्या उमेश याच्या या पांढऱ्या स्ट्रॉबेरीची काढणी सुरु झाली आहे. तिला सामान्य लाल स्ट्रॉबेरीच्या 250 रुपये किलो या दरापेक्षा सहापट अधिक दर मिळत असल्याचे उमेश सांगतो. सातारा जिल्ह्यासह अन्य ठिकाणी तसेच ऑनलाईन माध्यमांवरही आपण या पांढऱ्या स्ट्रॉबेरीची विक्री करत असल्याचे त्याने म्हटले आहे.

देशातील पहिलाच प्रयोग

फ्लोरिडा पर्ल जातीच्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन सर्वप्रथम अमेरिका आणि युकेमध्ये घेण्यात आले. याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे पुढे वेगवेगळ्या भागांमध्ये याचे उत्पन्न घ्यायला सुरुवात झाली. भारतात मात्र हा प्रयोग करण्यासाठी पहिला प्रयत्न उमेश खामकर यांनी केला. यासाठी फ्लोरिडा विद्यापीठाची रॉयल्टी राइट्स त्याने विकत घेतले आहे. त्यामुळे भारतात कुठेही या पांढऱ्या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घ्यायचे असेल तर त्यासाठी खामकर यांची परवानगी लागणार आहे. फ्लोरिडा पर्लचे वैशिष्ट्य म्हणजे ती नैसर्गिक दृष्ट्या गोड असलेली स्ट्रॉबेरी आहे. तिच्यात आंबटपणा नसतो. त्यामुळे ती ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे उमेश सांगतात.

error: Content is protected !!