Success Story : नोकरी सोडली, वराहपालनातून महिला शेतकऱ्याची 30 ते 40 लाखांची उलाढाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज 8 मार्च जगभर ‘महिला दिन’ (Success Story) म्हणून साजरा केला जात आहे. सध्याच्या काळात असे एकही क्षेत्र नाहीये. ज्यात महिलांनी आपला ठसा उमटवलेला नाहीये. शेती क्षेत्र देखील यापासून वेगळे राहिलेले नाही. अगदी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासह, शेतामध्ये ट्रॅक्टर चालवणे, मशागतीची सर्व कामे आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने महिला अगदी सहजपणे करताना आढळून येतात. शेतीआधारित उद्योगांमध्ये देखील महिला नेतृत्व स्वीकारून प्रभावीपणे व्यवसायात यश संपादन करताना दिसून येत आहे. आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्यांची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. ज्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून वराहपालन करत आपली आर्थिक प्रगती साधली आहे.

नोकरीत मन रमेना (Success Story Of Woman Pig Farming)

शेतकरी ऋजुता नारद चव्हाण असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून, त्या नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे. विशेष म्हणजे ऋजुता यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण (Success Story) घेतले असून, त्या एका खासगी कंपनीत काम करत होत्या. त्यांना पगारही चांगला मिळत होता. मात्र, त्यांना त्यांचे वडील नेहमीच वराहपालनाबाबत माहिती सांगायचे. त्यातून त्यांचेही नोकरी मन रमत नव्हते. त्यामुळे त्यांनी वराहपालनाबाबत माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी काही प्रशिक्षण शिबिरे देखील केल्याचे त्या सांगतात. ज्यामुळे त्यांना अधिक फायदा झाला आहे.

हरियाणातून केले वराह उपलब्ध

वराहपालन व्यवसायात यायचे निश्चित झाल्यांनतर त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी प्रथमतः ‘लार्ज व्हाईट यॉर्क शायर’ आणि ‘लँड्रेस’ या डुक्करांच्या युरोपात पाळल्या जाणाऱ्या जातीच्या 30 मादी व 3 नर डुकरांपासून त्यांनी वराहपालनाची सुरुवात केली. ही सर्व मादी व नर डुक्कर त्यांनी हरियाणातील एका वराह व्यावसायिकडून उपलब्ध केली होती. यासाठी आपल्या तीन एक शेतीपैकी अर्ध्या बिघा जमिनीत शेड आणि व्यवसायासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टींची उभारणी केली आहे. याशिवाय वराहपालन करताना खाद्यावरही अधिक खर्च नसतो असेही त्यांनी म्हटले आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी ऋजुता नारद चव्हाण सांगतात, आजकाल वराहपालन व्यवसायाकडे (Success Story) दर्जाहीन म्हणून पहिले जाते. मात्र, जी गोष्ट कोणीही करत नाही. त्यातच अधिक आर्थिक फायदा मिळत असतो. आपण देखील याच तत्वावर आपल्या वडिलांच्या सल्ल्याने या व्यवसायात पाय ठेवला. मागील सहा वर्षांपासून आपण या व्यवसायात असून, यातून आपल्याला खर्च वजा जाता सध्या वार्षिक 30 ते 40 लाखांची उलाढाल होत आहे. विशेष म्हणजे या व्यवसायात जास्त लक्ष देण्याची गरज नसते. डुकरांना कोणत्याही रोग येत नाही. ज्यामुळे पोल्ट्री व्यवसायाप्रमाणे यात तोटा होण्याचे प्रमाण खूपच असल्याचे त्या सांगतात. खबरदारीचा उपाय म्हणून आपण नियमित लसीकरण करत असतो. असेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!