Success Story : सैन्याची नोकरी सोडली; केळी पिकातून शेतकऱ्याची वार्षिक 6 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात अशी अनेक शेतकरी (Success Story) कुटुंब आहेत. ज्यांच्या घरातील कर्ता मुलगा देशाच्या सेवेसाठी आर्मीमध्ये काम करत आहे. राज्यातील सातारा जिल्हा तर ‘सैनिकांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे राज्यात अशी काही गावे आहे. ज्यातील प्रत्येक घरातील एक मुलगा सैन्यात जाऊन आपले आयुष्य खर्ची करत आहे. त्यामुळे देशसेवा करणारा सैनिक आणि शेतकरी (Success Story) यांचा खूप जवळचा संबंध आहे.

आज आपण अशाच एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सैनिकाच्या शेतीची यशोगाथा ((Success Story) पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या कॅन्सरपीडित आई-वडिलांच्या सेवेसाठी सैन्यातील नोकरीचा रिटायर होण्याआधीच राजीनामा देत शेतीची वाट धरली. विशेष म्हणजे ते आई-वडिलांची सेवा करण्यासोबतच, सेंद्रिय केळीच्या शेतीतून वार्षिक 6 लाखांची कमाई करत आहे.

सेंद्रिय पद्धतीने शेती (Success Story Of Organic Banana Farming)

राहुल असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तर प्रदेश जिल्ह्यातील बिजनोर जिल्ह्यातील रहिवासी आहे. राहुल यांनी 2020 मध्ये वेळेआधीच आपल्या आर्मीतील नोकरीचा (Success Story) राजीनामा दिला. आई-वडील दोघेही कॅन्सरग्रस्त असल्याने, त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राहुल यांनी गावी आल्यानंतर आपल्या आई-वडिलांची देखभाल करण्यासह जैविक शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी जैविक पद्धतीने केळी व ऊस लागवड सुरु केली.

किती मिळतंय उत्पन्न?

राहुल सांगतात, “आई-वडील दोघेही कॅन्सरग्रस्त असल्याचे निदान झाल्यानंतर आपण विषमुक्त शेती करण्याचे ठरवले. त्यानुसार आपण 3 एकर जमिनीत 3500 हजार केळीची झाडे लावली आहे. तर आणखी 5 एकर जमिनीमध्ये ऊस लागवड करतो. दोन्ही पिके आपण पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने घेत असून, ज्यामुळे आपल्याला उत्पादन खर्च कमी करण्यास मदत झाली आहे. यामध्ये केवळ 3 एकरातील केळी पिकाच्या माध्यमातूनच आपल्याला महिन्याला 50 ते 55 हजारांचा निव्वळ नफा होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्थात जैविक पद्धतीने केळी आणि ऊस लागवडीतून आर्थिक प्रगती साधण्यात त्यांना यश मिळाले आहे.

जैविक शेतीकडे वळण्याचे आवाहन

राहुल सांगतात, मागील चार वर्षांपासून आपण केळी आणि ऊस पिकाची शेती करत आहोत. त्यासाठी सर्व आधुनिक साधनांचा वापर करून, कमी कष्टात अधिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. इतकेच नाही तर आपण देशभर प्रवास करत शेतकऱ्यांना जैविक शेतीचे महत्व पटवून सांगत आहे. ज्यात कीटकनाशक आणि रासायनिक खतांमुळे आपल्या आई वडिलांच्या आजारामुळे कशा पद्धतीने जैविक शेतीकडे वळले, याचे महत्व शेतकऱ्यांना ते पटवून सांगत आहे. याशिवाय अधिकाधिक शेतकऱ्यांना जैविक पद्धतीने शेती करावी, असे आवाहनही ते करत आहे.

error: Content is protected !!