Success Story : मागे 1 रुपया किलोने विकला होता टोमॅटो, यंदा सगळं भरून काढलं अन दोनच महिन्यात 40 लाख कमावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत. टोमॅटोमुळे अनेक शेतकरी लखपती ते करोडपती झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारलेली पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची विक्री करून अगदी कमी दिवसांमध्ये लाखो ते करोडो रुपये कमवले आहेत. आपण अनेक शेतकऱ्यांच्या बातम्या देखील ऐकल्या असतील. सध्या देखील अशाच एका शेतकऱ्याने फक्त दोन महिन्यात चाळीस लाखांचे टोमॅटो मधून उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा होत आहे.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

अहमदनगरच्या शेतकऱ्याची होतेय सगळीकडे चर्चा

अहमदनगर मधील भातोडी या ठिकाणच्या शेतकऱ्याला दीड एकर टोमॅटोच्या शेतीमधून दोन महिन्यात चाळीस लाखांचे उत्पन्न मिळाले आहे त्यामुळे या शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.बबन धलपे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. मागच्या दहा वर्षापासून ते टोमॅटोचे उत्पन्न घेतात मात्र मागच्या दहा वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळाल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

80 ते 160 रुपये भाव मिळाला

यंदाच्या वर्षी त्यांच्या कष्टाचे चीज झाले असून त्यांना किलोला जवळपास 80 ते 160 रुपयांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे हा शेतकरी आणि त्याच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोमॅटो साठी लागवड औषध फवारणी, खत, तारेचे कुंपण असा एकूण दोन ते अडीच लाखांचा खर्च त्यांना आला मात्र हा खर्च वजा करून देखील त्यांना चांगल्या प्रमाणात नफा राहिला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

एक रुपया दरानेही विकला होता टोमॅटो

हा शेतकरी म्हणाला की, याआधी एक काळ असा होता ज्यावेळी मी एक रुपया दराने देखील टोमॅटो विक्री केली आहे. तर बऱ्याच वेळा टोमॅटोला दर नसल्यामुळे रस्त्यावर देखील टोमॅटो फेकून द्यावे लागले आहेत. मात्र यंदाच्या वर्षी उच्चांकी दर मिळाल्याने त्यामधून चांगला नफा मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.

error: Content is protected !!