Success Story : पोलीस अधिकारी करतोय 100 हुन अधिक विदेशी प्रजातीच्या फळांची शेती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दशकभरात महाराष्ट्रासह देशभरात विदेशी फळांची शेती (Success Story) करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांकडून शेतकऱ्यांना फळ पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना फळ पिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवण्यास मदत होत आहे. काही शेतकरी नोकरी सोडत,अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळशेतीकडे वळत आहे. आज आपण अशाच एका पोलीस अधिकाऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या शेतीमध्ये 100 हुन अधिक विदेशी प्रजातीच्या फळांची लागवड केली आहे.

दुर्मिळ विदेशी प्रजातीची लागवड (Success Story Fruit Farming)

साजी केवी असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते केरळच्या वायनाड जिल्ह्यातील नीवरम या गावामध्ये आपली शेती करत आहे. विशेष म्हणजे साजी केवी हे पोलीस दलात उच्च अधिकारी पदावर कार्यरत आहे. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी आपल्या शेतीमध्ये 100 प्रकारच्या विदेशातील दुर्मिळ फळांची शेती फुलवली आहे. त्यांनी आपल्या शेतीमध्ये ब्राझिलियन द्राक्षे जाबोटीबा, अत्यंत दुर्मिळ फळ असलेले लिपोटे, आफ्रिकेतील फळ असलेले मैमी चीकू, ऑस्ट्रेलियाचे फळ असलेले मैकाडामिया यांसारख्या 100 दुर्मिळ फळांची लागवड त्यांनी केली आहे.

घरातील बागेपासून सुचली कल्पना

शेतकरी आणि पोलीस अधिकारी असलेले साजी केवी हे सांगतात की, त्यांनी विदेशी फळांची लागवड करताना सुरुवात आपल्या घराच्या बागेपासून (Success Story) केली होती. मात्र, हळूहळू विदेशी फळांच्या शेतीत रमून गेल्याने, त्यांनी सध्या आपल्या शेतीमध्ये 100 हुन अधिक विदेश फळांची शेती करणे सुरु केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विदेशी वातावरणातील बदल आणि भारतीय वातावरण पूर्णपणे वेगळे असले तरी पिकांना काळजी घेऊन जगवले आहे. तसेच या विदेशी फळांच्या शेतीवर आपण प्रयोग करत करत आज १०० प्रजातीच्या माध्यमातून शेती फुलवली आहे.

कामातील ताण कमी करण्याचा मार्ग

शेतकरी आणि पोलीस अधिकारी असलेले साजी केवी हे सांगतात की, आपण जेव्हा विशेष ड्युटी दरम्यान बाहेर फिरत होतो. तेव्हा वेगवेगळ्या फळांची रोपे खरेदी करत होतो. ही रोपे घरी आणल्यानंतर आपले वडील देखील आपल्याला त्यांचे रोपण करण्यासाठी मदत करत होते. याशिवाय आपण ड्युटीवर असताना तेच सर्व फळपिकांची देखभाल करतात. विशेष म्हणजे नाहीशा होत असलेल्या फळ पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे. दुर्मिळ फळांच्या शेतीकडे वळण्याचा उद्देश हा केवळ कामातील ताण कमी करता यावा हा होता. आपल्या फळ शेतीच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न मिळण्यास वेळ असला तरी त्या माध्यमातून भविष्यात आपल्या मुलांना आपण खूप काही देऊन जाणार असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!