Success Story : नोकरी सोडली, 25 बिघे जमीन घेतली; कमाईतून सर्व शेतीत उभारले पॉलीहाऊस!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल अनेक जण गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीत रमताना (Success Story) दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे सुशिक्षित शेतकरी आपल्या शिक्षणाचा वापर करून, शेतीमधून मोठ्या प्रमाणात कमाई देखील करत आहेत. आज आपण अशाच एका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या मुंबई येथील नोकरीला रामराम करत, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजीपाल्याची शेती फुलवली आहे. एक नव्हे दोन नव्हे तर हळहळू कमाई करत-करत तब्बल 24 बिघे शेतीमध्ये पॉलीहाऊसची उभारणी (Success Story) केली आहे.

बँकेतील नोकरी सोडली (Success Story Polyhouse Built In 24 Bighe)

मनोज पराडकर असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी (Success Story) आहेत. शेतकरी मनोज हे मुंबई येथे बँकेत नोकरी करत होते. मात्र, नोकरीत मन रमत नसल्याने त्यांनी नोकरीला रामराम करत, गावाकडची वाट धरली. त्यानुसार त्यांनी शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने उत्पादन घेण्याचा मनी निर्धार केला. यासाठी त्यांनी नोकरीच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 25 बिघे जमीन खरेदी केली. सुरवातीला शेतीमध्ये त्यांना अनेक अडचणी आल्या. मात्र, सर्व अडचणींना जिकरीने तोंड देत, त्यांनी आपली एक प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे.

सिंधुदुर्ग, गोवा बाजारपेठ काबीज

शेतीत आल्यानंतर सर्व काही एका दिवसात होत नाही. अगदी असेच मनोज यांनाही खडतर प्रवास करावा लागला. मात्र, ते जराही डगमगले नाही. त्यांनी आज शेतीच्या उत्पन्नावर हळूहळू प्रगती करत, आपल्या 24 बिघे जमिनीत पॉलीहाऊस उभारले आहे. यात देश-विदेशातील विविध प्रजातीच्या भाजीपाल्याची लागवड करतात. आपला सर्व उत्पादित भाजीपाला ते सिंधुदुर्ग, सावंतवाडी आणि गोवा राज्यातील बाजारपेठांमध्ये पाठवतात. ज्यामुळे त्यांना अधिकचा दर मिळण्यास मदत होत आहे.

स्वतःचा ब्रँड विकसित

ते आपल्या पॉलीहाऊसमध्ये चेरी, टोमॅटो, ब्रोकली, झुकिनी, हॅलेपिनो यासारख्या विविध भाजीपाल्याची लागवड करत आहेत. त्यांनी जैविक पद्धतीने उत्पादित केलेल्या आपल्या भाजीपाल्याला ‘एक्झोबाइट’ या ब्रँडच्या माध्यमातून बाजारात उतरविले आहे. उच्चभ्रू लोकांमध्ये त्यांच्या या ब्रँडला विशेष मागणी आहे. इतकेच नाही तर अनेक प्रकारचा विदेशी भाजीपाला, विदेशी मिरची उत्पादनासाठी त्यांनी भाजीपाला केंद्र देखील उभारले आहे. ज्यामुळे त्यांना विदेशी भाजीपाल्याच्या विक्रीसाठी मदत होत आहे. याशिवाय ते ऑईस्टर मशरूमचे उत्पादन देखील घेत आहेत. ज्यामुळे सध्या त्यांना नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!