Success Story : नोकरीचा नाद सोडला, भाजीपाला शेतीतून करतोय वार्षिक 30 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या नवशिक्षित तरुण (Success Story) शेतीची वाट धरत आहे. शेतीला आधुनिकतेची जोड हे तरुण शेतीतून अधिक उत्पादन मिळवत आहे. विशेष म्हणजे आधुनिक साधनांच्या वापरातून, या तरुणांना बाराही महिने विविध पिकांचे उत्पादन घेता येत आहे. ज्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती होत आहे. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. जे आपल्या शेतीमध्ये पॉलीहाऊसची उभारणी करत, आधुनिक पद्धतीने भाजीपाला पिकांच्या लागवडीतून वार्षिक 30 लाख रुपयांची कमाई करत आहे.

पॉलीहाऊसची उभारणीसाठी अनुदान (Success Story Polyhouse Farming)

कमलेश मिश्रा असे या तरुण शेतकऱ्याचे (Success Story) नाव असून, ते उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्याच्या तिलई बेलवा गावचे रहिवासी आहे. कमलेश यांनी बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेतले असून, शिक्षणानंतर त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. शेतकरी कमलेश मिश्रा सांगतात, मार्च 2022 मध्ये आपण एक एकर शेतीमध्ये 43 लाख रुपये खर्च करून पॉलीहाऊसची उभारणी केली. यात आपल्याला उत्तरप्रदेश सरकारकडून पॉलीहाऊस उभारणीसाठी 20 लाख रुपये इतके अनुदान मिळाले. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून आपण आधुनिक पद्धतीने बाजारातील मागणी आणि दर यांचा अंदाज घेऊन विविध भाजीपाला पिकांची लागवड करत आहोत. ज्याद्वारे सर्व पिकांतून आपल्याला खर्च वजा जाता वार्षिक 30 लाखांची कमाई हमखास मिळते.

किती येतो वार्षिक खर्च?

शेतकरी कमलेश मिश्रा हे प्रामुख्याने आता आपल्या पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला लागवड (Success Story) करतात. त्यांनी सध्या आपल्या शेतीत उन्हाळी काकडी आणि रंगीबेरंगी शिमला मिरचीची लागवड केली आहे. भाजीपाला लागवडीदरम्यान आपण गुणवत्तापूर्ण बियाणे खरेदीवर अधिक भर देत असल्याचे ते सांगतात. याशिवाय आपण जैविक खतांच्या वापरासह गोमूत्र आधारित जैविक पद्धतीने कीटकनाशक फवारणी घेतो. ज्यामुळे प्रामुख्याने कीटकनाशकांवरील खर्च कमी होत असल्याचे ते सांगतात. आपला शेतीतील खर्च हा प्रामुख्याने मजुरी, फवारणी, बियाणे यावर होतो. यासाठी एकत्रिपणे वार्षिक जवळपास 5 लाखांचा खर्च येतो.

‘शेतकऱ्यांनी आधुनिकतेकडे वळावे’

शेतकरी कमलेश मिश्रा सांगतात, पॉलीहाऊसमध्ये बारमाही शेती करता येते. विशेष म्हणजे पॉलीहाऊसमध्ये शेती करताना पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट यांचा भाजीपाला पिकांवर कोणताही परिणाम होत नाही. यामध्ये आपण बाराही महिने भाजीपाला, फळे, फुलांची शेती करू शकतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर निश्चित उत्पन्नाची हमी मिळते. आपण देखील कॉमर्स क्षेत्रातील पदवी पूर्ण केल्यानंतर राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात जाऊन मोठ्या प्रमाणात उभारल्या गेलेल्या पॉलीहाऊसला भेट दिली. सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतरच स्थानिक कृषी विभागाच्या मदतीने पॉलीहाऊस उभारणीचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने पिकांच्या लागवडीत अडकून पडता आधुनिकतेची कसा धरावी, असे शेतकरी कमलेश मिश्रा यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!