Success Story : पुण्यातील रासकरांच्या भगव्या डाळिंबाची नेपाळ, बांगलादेशात हवा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकरी संजीव रासकर (Success Story) यांनी आपल्या दिड एकर क्षेत्रात 550 भगवा जातीची डाळिंबाची लागवड केली आहे. त्यांनी उत्पादित केलेले डाळिंब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नेपाळ बांगलादेशात निर्यात केली जातात. तर महाराष्ट्र तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कलकत्ता या ठिकाणी देखील त्यांचे डाळिंब विक्रीसाठी (Success Story) पाठवले जातात.

दीड एकरात लागवड (Success Story Pomegranate Farming)

भगवा जातीचे डाळिंब खाण्यासाठी गोड असतात. हे डाळिंब बागेतून तोडल्यानंतर (Success Story) जास्त काळ टिकते. आणि खाण्यास गोड असल्यामुळे या डाळिंबाच्या शेतीकडे संजीव रासकर यांचा कल असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून फळांची शेती करावी असा निश्चय संजीव रासकर यांनी केला त्यानुसार डाळिंबाची शेती करण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम 2019 मध्ये दीड एकरात डाळिंबाची शेती केली या शेतीची शास्रोक्त पद्धतीने या शेतीची देखभाल केली.

लागवडीपूर्वीचे नियोजन

जोपासना करून सप्टेंबर 2023 या वर्षात डाळिंबाचे वीस टन उत्पन्न घेतले. मात्र यात ना नफा ना तोटा झाला परंतु जिद्द सोडली नाही. डाळिंबाच्या शेतीविषयक (Success Story) त्यांना विचारले असता रासकर म्हणाले की जमीन मध्यम हलकी व पाण्याचा चांगला निचरा होणारी, सामू 6.5 ते 8 पर्यंत असणारी लागते हे पाहून त्यांनी त्यांच्या एकूण जमीनी पैकी दिड एकर जमीन निश्चित केली. त्यामध्ये 15 बाय 10 फुटावर ट्रॅक्टरने दीड फूट खोल सरी काढून रोप लागणीची आखणी केली. सरी मध्ये प्रथम फोलिडॉल पावडर व थाईमेट टाकून त्यावर शेजारील तापलेली माती भरून घेतली. त्यावर चांगले कुजलेले शेणखत एक घमेले टाकून खड्डे भरून घेतले.

पाच वर्षांपासून डाळिंब शेती

वळवाचे दोन पाऊस झाल्यावर खड्डयातील माती खाली बसल्यामुळे खड्डे स्पष्ट दिसू लागले. त्यामध्ये भगवा जातीची डाळिंबाची निरोगी रोपे आणून सप्टेंबर 2019 ला लागण केली. त्याला ठिंबक केले. एक ते दिड महिन्यात रोपांची चांगली वाढ सुरू झाली. त्याला दर दिड ते दोन महिन्यात बुडात खुरपणी करून काळजीपूर्वक छाटणी करून योग्य आकार दिला.

देश-विदेशात होतीये विक्री

किडरोग पाहून आवश्यकते नुसार कीटकनाशके वापरली. खतांच्या योग्य मात्रा दिल्या. त्यामुळे सप्टेंबर 2021 मध्ये पहिले उत्पादन चार टन झाले. त्यातून खर्च भागला. नंतर 2022 या वर्षात दुसरा बहार सात टन निघाला. त्यामध्ये खर्च भागून दोन लाखाचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला त्यानुसार डाळिंबाच्या शेतीकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील व्यापारांचे मदतीने उत्पादित केलेले डाळिंब बांग्लादेश, नेपाळ, या देशांसह इतर राज्यात विक्रीसाठी गेली.

नुकसान टाळण्यासाठी बागेवर क्रॉप कव्हर

डाळिंबाच्या बागेवर क्रॉप कव्हर टाकण्यात आलेली आहे की जेणेकरून डाळिंबाची शेती संपूर्णपणे झाकली जाते. तसेच रोग आणि उन्हाचा प्रादुर्भाव होत नाही. परिणामी डाळिंबाचे नुकसान होत नाही. किडरोग पाहून आवश्यकते नुसार कीटकनाशके वापरली. खतांच्या योग्य मात्रा दिल्या. त्यामुळे सप्टेंबर 2021 मध्ये पहिले उत्पादन चार टन झाले.

error: Content is protected !!