Success Story : फळपिकांमधून शेतकऱ्याने साधली प्रगती; 100 बिघ्यात यशस्वी नैसर्गिक शेती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकर्‍यांनी रासायनिक शेतीत बदल करून, नैसर्गिक पद्धतीने शाश्‍वत शेतीची (Success Story) कास धरणे गरजेचे आहे. त्यानुसार सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळत असून, मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील घेत आहेत. विशेष म्हणजे नैसर्गिक शेती करण्यासाठी उत्पादन खर्च कमी येत असल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न (Success Story) मिळत आहे.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी आदिल हसन यांनी देखील असाच नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. शेतकरी आदिल हसन यांची स्वतःची 100 बिघे जमीन असून, ते मागील काही वर्षांपासून आपल्या जमिनीत नैसर्गिक पद्धतीने गहू, धान, आंबा, लिची, आवळा यांसह अनेक पिके घेत आहेत. ज्यातून त्यांना भरघोस कमाई होत असल्याचे ते सांगतात. आज आपण शेतकरी आदिल हसन यांच्या 100 बिघे जमिनीतील नैसर्गिक शेतीची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

आंबा पिकातून वार्षिक शाश्वत कमाई (Success Story Of Farmer)

शेतकरी आदिल हसन यांनी आपल्या जमिनीत याकूती या प्रजातीच्या आंब्याची लागवड केली आहे. आदिल हसन सांगतात, या आंब्याला बाजारात अधिक मागणी असते. शिवाय अन्य प्रजातींच्या आंब्यापेक्षा त्याची गुणवत्ता चांगली असते. ज्यामुळे त्याला अधिक दर मिळतो. आपल्या याकुती आंब्याला हंगामात साधारणपणे २०० रुपये प्रति किलोच्या वरती दर मिळतो. ज्यामुळे आंबा हे आपले दरवर्षी ठरलेले पीक असल्याने, आपल्याला त्यातून दरवर्षी कमी कष्टात मोठे शाश्वत वार्षिक उत्पन्न मिळते. बेल, लिची, आवळा याची देखील लागवड केली असून, त्यातून वार्षिक कमाई होते. याशिवाय गहू, धान व अन्य फळपिके यांची देखील आपण कमी-अधिक प्रमाणात लागवड करत असल्याचे ते सांगतात.

उन्हाळयात टरबूज, खरबूज लागवड

शेतकरी आदिल हसन सांगतात, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण दरवर्षी टरबूज आणि खरबूज यांची प्रत्येकी दोन-दोन एकर क्षेत्रात लागवड करतो. खरबूज लागवडीसाठी बॉबी ही प्रजाती निवडली असून, नुकतीच लागवड करण्यात आली आहे. तर टरबुजाची लागवड आटोपली आहे. उन्हाळयाच्या दिवसांमध्ये या दोन्ही फळांना अधिक दर मिळत असल्याने आपल्याला त्यातून देखील वार्षिक १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे आदिल हसन सांगतात.

शेतकरी आदिल हसन सांगतात, आपण शेतीसाठी आधुनिक पद्धतीचा विलंब केला असून, पाण्यासाठी सर्व फळ पिकांना ठिबक सिंचन व्यवस्था उभारली आहे. ज्यामुळे आपल्याला कमी पाण्यात अधिक उत्पादन घेणे शक्य होते. याशिवाय शेतीमध्ये आपण इस्राईल पद्धतीने मल्चिंग पेपर वापर देखील करत आहोत. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळत, अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!