Success Story : धान पिकाला फाटा; शेतकऱ्याने फळबाग भाजीपाला पिकांतून साधली आर्थिक प्रगती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी शेती करताना एकाच पिकावर अवलंबून (Success Story) न राहता, पीक पद्धतीत विविधता आणत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी होण्यासह आर्थिक तोटा होण्याचा धोका संभवत नाही. याशिवाय त्यातून त्यांना अधिक उत्पन्न मिळते. आज अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी अत्यंत कमी जागेत बहूपीक पद्धतीतून अधिक उत्पन्न मिळवले आहे. शेतकरी लोमेश कोटांगले असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी फळबाग व भाजीपाला शेतीतून मोठा आर्थिक नफा कमवला आहे.

कोणत्या पिकांची लागवड? (Success Story Of Fruit-Vegetable Farming)

शेतकरी लोमेश कोटांगले यांची कढोली-जांभळी मार्गालगत शेती (Success Story) आहे. ज्या ठिकाणी ते दोन एकर धानाची शेती करत होते. पण ती आता बागायती केल्याने लागवड खर्च कमी, श्रम कमी, कमी सिंचनात दोन एकरात चार लाखांचे वार्षिक उत्पादन लोमेश कोटांगले घेत आहेत. स्वतःच्या मालकीच्या दोन एकर शेतीत 20 आंब्यांची झाडे, एक फणसाचे झाड, अर्धा एकरात मका, अर्धा एकरात कारले पीक घेतले आहे. अर्थात शेतकरी लोमेश यांनी प्रत्यक्षात पारंपरिक शेती नफ्यात आणून दाखवली असून, त्यांची मेहनत खरोखरच आर्थिकदृष्ट्या फळाला आली आहे.

किती मिळतेय वार्षिक उत्पन्न?

शेतकरी कोटांगले यांनी आपल्या शेतात दशेरी, लंगडा, पायरी अशी चांगल्या प्रजातीची २० आंब्याची झाडे आहेत. ही आंब्याची झाडे कोणत्याही लागवड खर्चाशिवाय वर्षाकाठी १ लाखांचे उत्पादन (Success Story) देतात. तर एका फणसाच्या झाडापासून त्यांना 20 हजार रुपयांची वार्षिक फळविक्री होते. याशिवाय त्यांना अर्धा एकरातील मका पिकातून यंदा सव्वा लाख रुपये आणि कारले पिकातून वार्षिक एक लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. अर्थात त्यांना एकूण वार्षिक साडेतीन लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळाले असल्याचे ते सांगतात.

धान पिकाला फाटा

शेतकरी लोमेश कोटांगले सांगतात, धानपट्टयात ‘धान एके धान, धान दुणे धान’ ही स्थिती आहे आणि नापिकी आली की, सरकारच्या विरोधात ओरडणे हा एकमेव मार्ग काही शेतकऱ्यांनी शोधला आहे. शेतकरी नवीन पर्याय शोधत नसल्यामुळे व नवीन प्रयोगांचा अभाव असल्यामुळे आमच्याकडील पाच एकर शेती असलेला शेतकरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या आजही सक्षम नाही. त्यामुळे आपण धान पिकास फाटा देत आंबा, फणस लावले असून, त्याद्वारे बँकेत गुंतवलेल्या पैशाला जसे व्याज मिळते, तसा पैसा फळबागेतून मिळतो.

error: Content is protected !!