Success Story : एसटी महामंडळाची नोकरी सोडली; 30 एकरात आंबा, नारळ, सुपारी, काजू बाग फुलवली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला अनेकांना शेती क्षेत्र आपलेसे वाटत आहे. इतकेच नाही तर अनेक जण आपली चांगल्या पगाराची नोकरी (Success Story) सोडून, शेतीमध्ये नशीब अजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे शेतीमध्ये झोकून देऊन, कष्ट घेतल्याने त्यांना शेतीमधून मोठ्या प्रमाणात कमाई देखील होत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या यशस्वी फळबाग शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी नोकरी सोडत आपल्या 30 एकर जमिनीमध्ये आंबा, नारळ, सुपारी, काजू, फणस यांच्या फळबागा (Success Story) उभ्या केल्या आहेत.

‘या फळ पिकांची केलीये लागवड? (Success Story Of Orchard Farming)

सतीश सोबळकर असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते रत्नागिरी जिल्ह्यातील भगवतीनगर गावचे रहिवासी आहेत. महाराष्ट्र सरकारच्या एसटी महामंडळात ते ड्रायव्हर म्हणून काम करत होते. मात्र, एसटी महामंडळात जवळपास 15 वर्ष सेवा बजावल्यानंतर, त्यांना शेतीमध्ये आवड (Success Story) निर्माण झाली. ज्यामुळे त्यांनी शेतीला पूर्णवेळ देण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यांची स्वतःची गावी 30 एकर जमीन असून, त्यांनी आपल्या या सर्व शेतीमध्ये 1050 आंबा झाडे, 200 नारळ झाडे, 250 सुपारी झाडे, 250 काजू झाडे, 30 फणस झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या 30 एकरावरील फळबागांचे पाण्याचे संपूर्ण सुयोग्य नियोजन केले आहे.

आंब्याची तीन प्रकारे विक्री

ते आपल्या शेतीमध्ये उत्पादित 50 टक्के आंबा वाशी मार्केटला (Success Story) पाठवतात. तर 50 टक्के आंब्याची थेट शेतातच व्यापाऱ्यांना विक्री करतात. इतकेच नाही तर आपल्याकडे उत्पादित काही आंब्याचे ते आमरस, आंबा पोळी, फणसाचे तळलेले गरे, पोळी तयार करून विक्री करतात. आंब्याचे भाव घसरल्यास अल्प भावात आंबा विक्रीपेक्षा प्रक्रिया उत्पादनांतून अधिक पैसे मिळविता येत असल्याने आपण हा मार्ग निवडत असल्याचे शेतकरी सतीश वसंती सोबळकर सांगतात. बाराही महिने त्यांच्याकडे कामासाठी त्यांनी स्थानिक चार ते पाच मजुरांना रोजगार देखील मिळवून दिला आहे.

मसाला पिकांचीही लागवड

शेतकरी सतीश सोबळकर हे आपल्या शेतीमध्ये उत्पादित काजू, सुपारी या पिकाची विक्री बाजारभाव पाहून करतात. ज्यासाठी त्यांना थेट व्यापारी खरेदी करतात. तर काही विक्रेते हे त्यांच्या बागेतून थेट फणस खरेदी करत असल्याचे ते सांगतात. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या नारळ, सुपारी बागेत मसाला पिकांची आंतर लागवड केली आहे. काळीमिरी, दालचिनी, जायफळ लागवड केली आहे. त्यातूनही त्यांना अतिरिक्त कमाई होते. अर्थात सर्व फळझाडांच्या लागवडीतून आपल्याला नोकरीपेक्षा अनेक पटीने अधिक नफा मिळत असल्याचे शेतकरी सतीश सोबळकर सांगतात.

error: Content is protected !!