Success Story : एकरी 150 टन ऊस उत्पादनाचा विक्रम; ऊसभूषण पुरस्काराने महिलेचा गौरव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतीमध्ये महिला शेतकरी (Success Story) देखील मागे नसल्याचे अनेक उदाहरणे समोर आहेत. विशेष म्हणजे महिला या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधूनिक पद्धतींचा प्रभावी वापर करत क्रांती घडवून आणत आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील एका महिला शेतकऱ्याने राज्यातील विक्रमी एकरी 150 टन उसाचे उत्पादन घेतले असून, त्यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून सर्वाधिक ऊस उत्पादन घेण्याबाबत ऊसभूषण पुरस्काराने सन्मानित (Success Story) करण्यात आले आहे.

विमल चौगुले (Success Story) असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून, त्या शिरोळ तालुक्यातील मजरेवारी येथील रहिवासी आहे. सप्टेंबर 2021 मध्ये विमल यांनी आपल्या उसाची लागवड केली होती. यासाठी त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत उसाची लागवड केली. लागवडीपूर्वी त्यांनी आपल्या शेतात पिकांची फेरपालट केली. जेणेकरून मातीचा पोत सुधारत उत्पादन वाढीस मदत व्हावी. त्यासाठी त्यांनी केळी आणि मिरचीचे पीक घेतले. ज्यामुळे ऊस पिकाला पोषक अन्नद्रव्ये मिळून, अधिक उत्पन्न मिळण्यास फायदा झाल्याचे त्या सांगतात.

कसे केले खत व्यवस्थापन? (Success Story Of Women Sugarcane Farmer)

शेतकरी विमल चौगुले सांगतात, ऊस पिकासाठी कोणत्याही रासायनिक खतांचा वापर आपण केलेला नाही. आपण दुग्धव्यवसाय करत असल्याने जनावरांचे मोठ्या प्रमाणात शेण उपलब्ध असते. या उपलब्ध शेणाचा वापर करून, सेंद्रिय खताची निर्मिती केली. यासाठी शेतातील पालापाचोळा आणि उसाचे पाचट यास शेतातच कुजवून त्याचा वापर होतो. याशिवाय ऊस पिकासाठी आपण माती परीक्षण करत असून, मातीत कोणती अन्नद्रव्ये कमी आहेत. याचा आढावा घेत ऊस पिकाला खताचे नियोजन केले होते.

सिंचनाची सोय

शेतकरी विमल चौगुले यांनी आपल्या उसाला भर पाणी पद्धतीने पाणी न देता ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. ज्यामुळे त्यांना पाण्याचे नियोजन करत मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेण्यास मदत झाली. पाण्याचे योग्य नियोजन केल्याने त्यांच्या उसाची वाढही चांगली झाल्याचे त्या सांगतात. इतकेच नाही तर त्यांनी उसाला ठिबकच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली आहेत. पिकांची फेरपालट, खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजन या त्रिसूत्रीचा अवलंब करत आपण हे यश मिळवण्याचे त्या सांगतात.

पुरस्काराने सन्मानित

नुकताच पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमार्फत राज्यातील सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मान करण्यात आला. यात शेतकरी विमल चौगुले या राज्यातील विक्रमी एकरी 150 टन उसाचे उत्पादन घेत पहिल्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांना आपल्या यशाबद्दल इन्स्टिट्युटकडून कै. यशवंतराव चव्हाण (ऊसभूषण पुरस्कार) हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

error: Content is protected !!