Success Story : दुष्काळी लातूरमध्ये विदेशी लाल मिरचीची शेती; तरुणाने साधली आर्थिक प्रगती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकरी अधिक नफा मिळवून (Success Story) देणाऱ्या पिकांच्या लागवडीवर भर देत आहेत. यात काही शेतकरी हे नाविन्यपूर्ण पिकांच्या लागवडीचे प्रयोग करत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना यात यश देखील मिळत आहे. 10 ते 15 दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने विदेशी प्रजातीच्या केळीची यशस्वी लागवड केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता अशाच एका शेतकऱ्याने विदेशी लाल मिरचीचे यशस्वी उत्पादन घेतल्याचे समोर आले आहे. आज आपण या शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

दुष्काळी पट्टा म्हणून ओळख (Success Story Red Chilli Farming)

गणेश नन्नागिरे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, ते लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नांदगाव येथील रहिवासी (Success Story) आहे. लातूर जिल्हा हा प्रामुख्याने मराठवाड्यातील दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. 8 वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र आता याच लातूर जिल्ह्यात नांदगाव येथे शेतकरी गणेश नन्नागिरे यांनी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विदेशी वाणाच्या लाल मिरचीची यशस्वी लागवड केली आहे.

पाण्याचे सुयोग्य नियोजन

लातूर हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असला. तरी गणेशने आपल्याकडील उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करून शेती फुलवली आहे. त्याने आपल्या दोन एकरात ड्रीप आणि मल्चिंग पेपरच्या साहाय्याने कमी पाण्यात विदेशी वाणाच्या मिरचीची लागवड केली आहे. याशिवाय आपल्या नाविन्यपूर्ण मिरची पिकाचा फांद्यांचा झाप मोठा असल्याने, त्याने त्याची टोमॅटोप्रमाणे बांधणी देखील केली आहे.

किती मिळतोय दर?

शेतकरी गणेश नन्नागिरे याने आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड दिली असून, त्यासोबतच त्याने करार पद्धतीचा देखील अवलंब केला आहे. सध्या गणेशच्या मिरचीचा तोडा सुरु असून, त्याने एका कंपनीसोबत करार केला आहे. ज्याद्वारे तो आपली मिरची विदेशात निर्यात करत आहे. त्यातून त्याला मिरचीला चांगला भाव देखील मिळत आहे.

सध्या तोडणी सुरु असून आपल्या मिरचीला प्रति क्विंटलसाठी ओल्या मिरचीला 29000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. असेही त्याने म्हटले आहे. लातूर सारख्या दुष्काळी भागात विदेशी वाणाच्या लाल मिरचीचे उत्पादन घेणे. आणि त्यातून आपली आर्थिक प्रगती सुधारणे. यातच गणेशचे शेतीतील यश दडलेले आहे. सध्या तो आपल्या गावात सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

error: Content is protected !!