हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतीला मोठे महत्व प्राप्त झाले असून, इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण (Success Story) घेतलेले तरुण देखील आपल्या कल्पकतेने शेती फुलवत असल्याच्या यशोगाथा समोर येत आहे. अशातच आता फुल शेतीचे महत्व पाहता आणि मिळणारी हक्काची बाजारपेठ पाहता एका इंजिनिअर तरुणाने फुल शेतीतून प्रगती साधल्याचे समोर आले आहे. जरबेरा लागवडीतून या तरुणाने पहिल्याच वर्षी लाखोंची कमाई (Success Story) केली आहे.
झारखंडमधील जमशेदपूर जिल्ह्यातील पाटमाडा येथील सुशांत दत्ता असे या आधुनिक व सुशिक्षित शेतकऱ्याचे (Success Story) नाव आहे. आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुशांत याने अनेक कंपन्यांच्या नोकरीच्या ऑफर नाकारल्या. शेतीसोबत नाळ जोडलेली असल्याने त्याला शेतीमध्ये काहीतरी नवीन करून दाखवण्याची उर्मी होती. याच इच्छेपोटी त्याने नवीन तंत्रज्ञानाची मदत घेत शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये फुलशेती करण्याचे ठरवले. आज याच फुल शेतीतून सुशांत लाखोंची कमाई करत आहे. सुशांत मूळचा झारखंडमधील जमशेदपूर पाटमाडा येथील रहिवासी आहे आणि तेथेच तो कुटुंबासोबत शेती करतो.
2700 जरबेरा रोपांची लागवड (Success Story Of Flower Farming)
सुशांत याने आपल्या शेतामध्ये पाच रंगांच्या जरबेरा फुलांची लागवड केली आहे. त्याने निवड केलेल्या या प्रजातीच्या फुलांना बाजारात सर्वात जास्त दर मिळतो. फुल शेती करण्याआधी सुशांत याने आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून घेतले. फुलशेतीसाठी त्याला बँकेकडून कर्ज उपलब्ध झाले. ज्यातून त्याने पॉली हाऊस उभारले आहे. जरबेरा फुलांची लागवड करताना त्याने आधी सर्व माहिती मिळवली. त्यानंतर पाच प्रजातींची 2700 जरबेरा रोपे उपलब्ध करत त्याने आपल्या शेतात लागवड केली. अवघ्या सहा महिन्यामध्ये सुशांतला त्यातून लाखो रुपयांची कमाई झाल्याचे तो सांगतो.
किती मिळते उत्पन्न
सध्या सुशांत याच्या जरबेरा फुलांची तोडणी सुरु झाली असून, पहिल्याच वर्षी रोपांना आठवड्यातून दोनदा फुले काढणीला येत आहेत. ही फुले बाजारात विक्रीसाठी पाठवून त्याला चांगला नफा मिळत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम, धार्मिक कार्यक्रमांमुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आपण हंगाम लक्षात घेऊन जरबेरा लागवड केली होती. परिणामी नियमित फुले तोडणी सुरु असून, आपल्याला जरबेरा फुलशेतीमधून वार्षिक चार ते पाच लाख रुपयांचा नफा मिळण्याची अपेक्षा असल्याचे सुशांत सांगतो. सुशांतचे अनुकरून करून गावात आज अनेक शेतकरी फुलशेती करत असून, प्रसंगी आपण त्यांना सर्व मार्गदर्शन करत असल्याचे तो सांगतो.