Success Story : मानलं गुरुजी! चक्क…सेवानिवृत्तीनंतर हिमालयातील फळाची शेती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सफरचंदाची शेती म्हटले की आपल्याला काश्मीर, हिमाचल प्रदेशमधील शेती (Success Story) डोळ्यासमोर उभी राहते. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीसंबंधीच्या आधुनिक संशोधनामुळे शेतकरी कोणत्याही प्रदेशातील पिकाची लागवड करून ते यशस्वी करताना दिसून येत आहेत. अगदी अशाच पद्धतीने तंत्रज्ञानाचा आधार घेऊन पुण्यातील इंदापूर तालुक्यात सफरचंदाची शेती केली (Success Story) जात आहेत. सणसर येथील शेतकरी प्रभाकर खरात यांनी ही सफरचंदाची शेती केलीये.

दार्जिलिंगहून आणली रोपे (Success Story Of Apple Farming In Pune)

प्रभाकर खरात हे सेवानिवृत्त शिक्षक असून, आपल्या निवृत्तीनंतर त्यांनी शेती (Success Story) करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी शेतीमध्ये पारंपरिक पिके न घेता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा पर्याय निवडला. पीक घ्यावे कोणते हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. याच कालावधीत प्रभाकर खरात यांचा मोठा मुलगा किशोर यांनी सफरचंद शेतीबाबत सर्व माहिती समजून घेण्यासाठी जम्मू-काश्मीरला भेट दिली होती व त्या ठिकाणी त्यांनी या पिकाबाबतचे सर्व बारकावे माहिती करून घेतले. त्यानंतर याविषयी संपूर्ण माहिती त्यांनी वडील प्रभाकर खरात आणि भाऊ कालिदास यांना सांगितली. त्यामुळे प्रभाकर खरात यांनी सफरचंदाच्या शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी दार्जिलिंगमधून सफरचंदाची रोपे मागवली. या रोपांची लागवड करुन अवघ्या 15 ते 19 महिन्यात त्यांनी सफरचंदाचे पहिले उत्पादन यशस्वीपणे काढले.

सेंद्रिय पद्धतीने लागवड

दार्जिलिंग येथून प्रभाकर खरात यांनी सफरचंदाची रोपे आणली त्या रोपांची लागवड त्यांनी दहा गुंठे क्षेत्रात केली. यासाठी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून खूप काळजी घ्यावी लागली व याकरिता संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन त्यांनी याबाबतचे नियोजन केले आहे. पहिल्यांदा दहा गुंठे क्षेत्रामध्ये त्यांनी सफरचंदाचा यशस्वी प्रयोग केला व आता पुन्हा दहा गुंठे सफरचंद लागवड त्यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षापासून ते सफरचंदाची लागवड करत आहेत. प्रभाकर खरात यांच्या सफरचंद बागेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या झाडांकरिता कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यावर भर दिलेला आहे.

मोठ्या गुंतवणूकीची गरज

प्रभाकर खरात सांगतात की, सफरचंद शेतीमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करावी लागते. तसेच ही शेती करत असताना सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. यासाठी थंड हवेचे ठिकाण हवे असते. कारण त्याशिवाय उत्पादन चांगले होत नाही. जम्मू-काश्मीर सोडून इतर ठिकाणी सफरचंदाची शेती करता येते. हेच निवृत्त शिक्षक असणाऱ्या प्रभाकर खरात यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

error: Content is protected !!