Success Story : देशातील सर्वात श्रीमंत महिला शेतकरी; केंद्रीय मंत्र्यांकडून झालाय सन्मान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकातील महिला शेतकरी रत्नम्मा गुंडमंथा (Success Story) यांना नुकताच ‘मिलिनीयर फार्मर ऑफ अवॉर्ड 2023’ प्रदान करण्यात आला आहे. त्या यावर्षी देशातील सर्वात श्रीमंत महिला शेतकरी ठरल्याने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री परषोत्तम रुपाला यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान (Success Story) करण्यात आला आहे.

कोण आहेत रत्नम्मा गुंडमंथा? (Success Story Of Richest Woman Farmer)

कर्नाटकातील श्रीनिवासपुरा तालुक्यातील महिला शेतकरी रत्नम्मा गुंडमंथा यांचे पीयूसी, टीसीएचपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांची एकूण 4 एकर शेती असून, यात त्यांनी दोन एकर आंब्याची बाग, एक एकरात बाजरी लागवड, तर अन्य एक एकरात त्या रेशीम शेती करत आहेत. त्या आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. यासाठी त्या आपल्या शेतात ICAR-KVK, कोलारद्वारे दिलेले सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरत आहे. त्याचबरोबर केव्हीके, कोलारतर्फे आयोजित कॅम्पस प्रशिक्षणात त्यांनी पाच दिवसांचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे.

लोणची, मसाला उत्पादने

रत्नम्मा यांनी आपल्या शेतीला व्यवसायाची जोड दिली असून, त्या धान्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच आंबा, बदाम आणि टोमॅटो यांची लोणची उत्पादित करतात. यासोबतच त्यांनी आपला मसाल्याच्या पावडरचा ब्रँड विकसित केला आहे. यासाठी त्यांनी ICAR-KVK कोलारचा सल्ला घेतला आहे. याशिवाय त्यांनी आपल्या बागेत नैसर्गिकरित्या आंबा पिकवण्याचे तंत्र विकसित केले आहे. आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी त्यांनी स्वयंसेवी संस्था आणि बचत गटाच्या महिलांच्या मदत घेतली आहे. तसेच त्या 2018-19 पासून धान्यांवर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे.

वार्षिक एक कोटींची कमाई

कृषी उत्पादनांबरोबरच त्या धान्य उत्पादन आणि धान्यावर प्रक्रिया करतात. धान्य आणि धान्य माल्टिंग, धान्य उप-मिश्रण आणि धान्य साफ करणे आणि ग्रेन डोसा मिक्स आणि ग्रेन इडली मिक्स आणि इतर सामान्य उत्पादने जसे की आंब्याचे लोणचे, टोमॅटो लोणचे, मसाला पावडर उत्पादने तयार करतात. ही सर्व उत्पादने त्या स्वतःच्या ब्रँड नावाने बाजारात विकत आहे. रत्नम्मा वैदिक खाद्यपदार्थांसह देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे. यातून त्यांची वार्षिक अंदाजित 1.18 कोटींची उलाढाल होत आहे.

error: Content is protected !!