Success Story : ऊस शेतीतून बांधला ‘राजेशाही बंगला’; नाव दिले ‘उसाच्या 0238 बेण्याची’ कृपा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादनात आघाडीवर (Success Story) असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. राज्यातील ऊस पट्टा ‘सधन पट्टा’ म्हणून ओळखला जातो. कारण राज्यातील ऊस उत्पादन हे बारमाही पाणी असलेल्या भागांमध्ये होत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, आता एका शेतकऱ्याने आपल्या याच ऊस पिकाच्या जोरावर मोठा दोन मजली ‘राजेशाही बंगला’ बांधला आहे. याशिवाय बोलेरो फोर व्हिलर, दोन ट्रॅक्टर, घरात तीन-चार लग्न कार्य देखील केले. आज आपण या ऊस शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी उसाच्या 0238 या वाणाच्या लागवडीतून आपली आर्थिक प्रगती (Success Story) साधली आहे.

बंगल्याला दिले ‘0238 ची कृपा’ नाव (Success Story Of Sugarcane Farming)

कुलवीर सिंह असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील तिसोतरा गावचे रहिवासी आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच उत्तरप्रदेश हे ऊस उत्पादनातील आघाडीवरील राज्य आहे. शेतकरी कुलवीर सिंह हे 2009-10 पासून उसाच्या ‘0238’ या बियाण्याच्या माध्यमातून ऊस शेती करत आहे. याच ऊस शेतीच्या जोरावर त्यांनी आज लाखोंची संपत्ती (Success Story) मिळवली असून, मोठा राजेशाही बंगला देखील बांधला आहे. त्याला त्यांनी ‘0238 ची कृपा’ असे नाव दिले आहे. ज्यामुळे त्यांच्याकडे आलेले कोणतेही पाहुणे हे प्रथम बुचकळ्यात पडतात. मात्र, ऊस शेतीतून आर्थिक प्रगती साधल्याने त्यांनी आपल्या या भव्यदिव्य बंगल्याला ‘0238 ची कृपा’ असे नाव दिले आहे. त्यांच्या या बंगल्याची सध्या सर्वदूर चर्चा होत आहे.

15 वर्षांत साधली आर्थिक प्रगती

शेतकरी कुलवीर सिंह सांगतात, आपण 2009-10 पासून उसाच्या ‘0238’ वाणाची लागवड करत आहोत. या वाणाच्या माध्यमातून आपण मागील 15 वर्षांपासून मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. आपली ही प्रगती प्रामुख्याने उसाचे योग्य वाण निवडल्याने झाली आहे. या जातीमुळे आपल्याला दरवर्षी भरघोस उत्पादन मिळत आहे. शेतमालाला भाव आपण ठरवू शकत नाही. मात्र अधिक उत्पादन घेत आपण प्रगती साधू शकतो. असे त्यांनी म्हटले आहे. ते सांगतात, आपण या वाणाच्या ऊस लागवडीतून मागील पंधरा वर्षात मोठा भव्य असा दोन मजली बंगला, तीन बोअरवेल, घरातील 3 ते 4 लग्न समारंभ, 2 ट्रॅक्टर खरेदी केले. याशिवाय बोलेरो फोर व्हिलर देखील घेतली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उसाच्या ‘0238’ वाणाची वैशिष्ट्ये

शेतकरी कुलवीर सिंह (Success Story) सांगतात, उसाच्या ‘0238’ या वाणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही वाण कमी उत्पादन खर्चात अधिक नफा मिळवून देणारे वाण आहे. या वाणाची लागवड करताना जवळपास दोन ऊस रोपांमध्ये 5 फूट इतके अंतर ठेवावे लागते. या वाणाची लागवड करताना एक बिघे जमिनीमध्ये जवळपास 2 क्विंटल इतक्या बेण्याची आवश्यकता असते. विशेष अन्य ऊस वाणांच्या तुलनेत या उसाची जाडी ही खूप अधिक असते. ज्यामुळे या उसाची गुणवत्ता चांगली असल्याने, त्यातून अधिक साखर उतारा मिळण्यास देखील मदत होते.असेही त्यांनी शेवटी सांगितले आहे.

error: Content is protected !!