हॅलो कृषी ऑनलाईन : एखाद्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी आपल्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असल्यास, त्या क्षेत्रात अतुल्य यश (Success Story) मिळवता येते. हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका तरुण दूध उत्पादक शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. राज्यात अनेक शेतकरी डेअरी व्यवसाय करतात. त्यातून भरघोस कमाई देखील करतात. मात्र, स्वतःची जमीन, स्वतःची कोणतीही जागा नसताना एका तरुण शेतकऱ्याने दूध व्यवसायात आपले एक स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे तो यातून मोठी कमाई (Success Story) देखील करत आहे.
स्वतः करतात दुध विक्री (Success Story Of Dairy Farming)
सध्या जातिवंत जनावरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातून दूध व्यवसाय (Success Story) करायचा म्हटले तरी आपल्या स्वतःची जागा, चारा उत्पादनासाठी थोडीफार शेती ही लागतेच. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांत जमिनीत पाण्याची उपलब्धता ही असावी लागते. मात्र यातील काहीही नसताना श्रीरामपूरच्या टिळकनगर येथील तरुण शेतकरी आशुतोष बाळासाहेब भोसले यांनी दूध व्यवसाय उभा केला आहे. त्यांनी दूध व्यवसाय नुसता उभाच केला नाही तर या व्यवसायात त्यांनी भक्कम पाय देखील रोवले आहेत. डेअरीला दुधास योग्य दर मिळत नसल्याने, त्यांनी या व्यवसायात स्वतः हात विक्रीने दूध विकण्याचा यशस्वी प्रयोग केला. त्यासाठी ते श्रीरामपूरच्या मुख्य चौकात सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन अशी बसून दूध विक्री करतात. त्यास ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, त्यांचे दूध लगोलाग विकले जात आहे.
भाडे कराराने घेतली शेती
2017 साली आशुतोष यांनी स्वतःचे काही भांडवल आणि कर्ज उभारून दहा गायींच्या माध्यमातून आपला दूध व्यवसाय सुरु केला. आज त्यांच्या गोठ्यात 28 गाई आणि 45 कालवडी आहेत. त्यांच्या सर्व गायी या होलस्टीन फ्रिजियन या प्रजातीच्या आहेत. त्यांनी दूध व्यवसाय करण्यासाठी जवळपास 7 एकर शेती भाडे कराराने घेतली आहे. आता तुम्ही म्हणाल भाडे कराराच्या जमिनीवर त्यांनी गोठा कसा उभारला, तर त्यासाठी त्यांनी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केला आहे. तसेच गरजेनुसार ऊन, पावसाळा आणि थंडीपासून संरक्षणासाठी शेड उभारले आहे. ते आपल्या गायींसाठी संपूर्ण चारा विकत घेत आहेत.
किती मिळते उत्पन्न?
अविनाश यांच्या म्हणण्यानुसार, दूध व्यवसायासाठी जातिवंत जनावरे असणे खुप गरजेचे असते. आपल्याकडे दररोज एक 48 लिटर दूध देणारी गाय असून, आपण त्या गायीपासून जातिवंत कालवडी तयार करत आहोत. सध्याच्या घडीला आपल्याकडे 460-470 लिटर दूध उत्पादित होत असून, आपण ते स्वतः हातविक्रीने 50 रुपये प्रति लिटर दराने विक्री करतो. विक्रीनंतर उरलेल्या जवळपास 100 एक लिटर दुधावर प्रक्रिया करून पनीर, दही लस्सी बनवतो. जे हॉटेल व्यावसायिकांना विकले जाते. तसेच वार्षिक शेणखताच्या विक्रीतूनही आपल्याला काही उत्पन्न मिळते.