Success Story : अर्ध्या एकरात सहा लाखांची कमाई; इंजिनिअर तरुणाची कमाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बाजारपेठेतील मागणी आणि त्यास तंत्रज्ञानाची (Success Story) जोड देत शेती केल्यास आपल्याला यशापासून कोणीही रोखू शकत नाही. हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील चेतन निंबाळकर (Success Story) याने दाखवून दिले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या चेतनने महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची केमिस्ट्री सोलापूरच्या दुष्काळी पट्ट्यात जुळवून आणली असून, त्याद्वारे अर्धा एकरात त्याने लाखोंची कमाई केली आहे.

लॉकडाऊननंतर अनेकांनी आपला रोजगार गमावला. चेतनही नुकताच प्रशिक्षणार्थी म्हणून एका कंपनीत रुजू झाला होता. पण नियतीला काही वेगळच मान्य होते. अवघ्या दोन ते तीन महिन्यात लॉकडाऊन होऊन त्याला करमाळा येथे आपल्या गावी जावे लागेल. दोन वर्षे ऊस आणि केळीची शेती केल्यानंतर चेतनला स्ट्रॉबेरी लागवडीची कल्पना सुचली. त्याने सप्टेंबर महिन्यात अर्धा एकरात 6 हजार रोपे आणून, स्ट्रॉबेरीची लागवड केली. लागवडीनंतर चेतनने खत व पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले असून, त्याद्वारे त्याला चांगले उत्पादन मिळाले आहे.

पुणे, मुंबईत विक्री (Success Story Of Strawberry Farming)

दोन महिन्यांच्या कालावधीनंतर त्याच्या स्ट्रॉबेरीची तोडणी सुरू झाली असून, त्याला एकरी 4 टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या आपल्या मालाची प्रतवारी करून तो स्वतः पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी बाजारपेठेत आपला माल पाठवत आहे. त्यातून त्याला 400 रुपये प्रति किलो इतका दर मिळत आहे. याशिवाय काही माल तो करमाळा, बार्शी आणि आसपासच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये पाठवत आहे.

किती मिळतोय दर

सध्या चेतनच्या स्ट्रॉबेरीची तोडणी सुरू असून, त्याला तीन ते चार टनांपर्यंत उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. 400 रुपये प्रति किलो दराने त्याला अर्ध्या एकरातून सहा ते सात लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता महाबळेश्वरच्या थंड हवेतील स्ट्रॉबेरीचे चेतनने सोलापूरच्या दुष्काळी पट्ट्यात नंदनवन फुलवल्याने, शेतीमध्ये येऊ पाहणाऱ्या तरुण पिढीसाठी तो नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

error: Content is protected !!