Success Story : महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी फुलली पंजाबच्या मातीत; 6 महिन्यात 5 लाखांचा नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्यावर भर (Success Story) देत आहेत. केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता नवे प्रयोगही ते आपल्या शेतीत करत आहेत. त्यामुळेच सध्या स्ट्रॉबेरीच्या पिकाला महाराष्ट्रातच नाही तर देशभर चांगलीच पसंती मिळत आहे. अनेक शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेत आहेत. हे पिक केवळ थंड प्रदेशातच नाही तर अगदी महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि गोवा या राज्यांमध्ये देखील घेतले जात आहे. या पिकात गुंतवणुकीच्या तुलनेत चांगला नफा मिळतानाही दिसत आहे. त्यामुळे आज आपण अशाच एका स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

पुण्यातून केली रोपे उपलब्ध (Success Story Of Strawberry Farming)

पंजाबच्या फरीदकोट येथील शेतकरी मानीसिंगवाला या गावचे शेतकरी प्रदीप सिंह यांनी पारंपरिक गहू पिकाला फाटा देत स्ट्रॉबेरी पिकाची लागवड सुरु केली आहे. यात त्यांना त्यांच्या पत्नीची विशेष साथ मिळत आहे. दोन वर्षांपासून ते स्ट्रॉबेरीचे पीक घेत असून, यातून त्यांना प्रति 6 महिन्यांनी 5 लाख रुपयांचा नफा मिळत आहे. प्रदीप सिंह यांच्या म्हणण्यानुसार, ‘स्ट्रॉबेरीच्या लागवडीची कल्पना सुचल्यानंतर आपण त्याबाबत माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्रातील पुणे येथून प्रथम काही रोपे आणली. रोपांची चांगली वाढ झाल्यानंतर आपण अधिक रोपांची मागणी करत, दोन वर्षांपासून स्ट्रॉबेरीची शेती करत आहे.

किती मिळते उत्पन्न?

प्रदीप सिंह सांगतात ‘स्ट्रॉबेरीची लागवड करताना शेतीत आपल्याला पत्नीची मोठी साथ मिळते. ती सर्व माल पॅकिंग करण्याचे काम बघते. शेतात उत्पादित होणारी स्ट्रॉबेरी पंजाबमधील मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवली जाते. एकूण खर्च काढल्यानंतर वजा करता आपल्याला पाच लाख रुपयांचा नफा होतो. इतर पिकांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. याशिवाय आपण शेतात स्ट्रॉबेरीसह मिरची आणि कांद्याची देखील लागवड केली आहे. इतकेच नाही तर आता आपले अनुकरण करत आसपासचे अनेक शेतकरी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत आहे.’

पत्नीचीही खंबीर साथ

प्रदीप सिंह यांनी इतर शेतकऱ्यांना पारंपरिक शेती सोडून स्ट्रॉबेरीसारखी नगदी पिके घेण्याचा सल्ला देतात. त्यांची पत्नी कुलविंदर कौर यांच्या म्हणण्यानुसार, ‘आम्ही स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. तेव्हा आपल्या पतीने आपणास शेतात काम करायचे सुचवले. आपण लगेचच त्यासाठी तयारी दर्शवली. कारण मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. लहानपणापासून शेतात काम करत आले आहे. सध्या आपल्या स्ट्रॉबेरीच्या शेतीतून गावातील इतर महिलांनाही रोजगार देत आहोत.’ 

error: Content is protected !!