Success Story : 5 बिघ्यात 8 लाखांचा निव्वळ नफा; स्ट्रॉबेरी, भाजीपाला पिकातून शेतकऱ्याची कमाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दशभरात तरुणांचा ओढा शेतीकडे (Success Story) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तरुण शेतीला आपले भविष्य मानून नवनवीन पिकांची लागवड करत आहे. विशेष म्हणजे राज्यातील तरुण शेतकरी आपल्या या नवनवीन शेती पिकांच्या लागवडीतून अधिकचे उत्पन्न देखील मिळवत आहेत. आज आपण अशाच एका प्रयोगशील तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जो आपल्या शेतीमध्ये भाजीपाल्याची विविध पिके व स्ट्रॉबेरी या पिकातून बक्कळ कमाई करत आहे. एका हेक्टर (5 बिघे) क्षेत्रामध्ये या पिकांच्या माध्यमातून हा शेतकरी वार्षिक 8 लाखांचा निव्वळ नफा (Success Story) मिळवत आहे.

बाजारातील मागणीनुसार लागवड (Success Story Strawberry, vegetable Crops)

आशुतोष पांडे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, ते बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील (Success Story) रहिवासी आहेत. त्यांनी सध्या आपल्या 5 बिघे शेतीमध्ये स्ट्रॉबेरी या प्रमुख पिकासह बटाटा, वाल, शिमला मिरची, चवळी आणि धने अशा विविध भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. मागील काही वर्षांपासून आशुतोष बाजाराचा अंदाज घेऊन, आपल्या शेतात भाजीपाला पिकांची लागवड करतात. शक्यतो बाजारात पुरवठा नसताना, ते आपले भाजीपाला पीक त्याचवेळी कसे काढणीला येईल. जेणेकरून अधिकचा दर मिळून अधिक उत्पन्न मिळवता येईल. यावर भर देतात. असे ते सांगतात.

स्ट्रॉबेरी प्रमुख पीक

शेतकरी आशुतोष पांडे यांनी आपल्या एकूण एक हेक्टर शेतीपैकी 0.25 हेक्टर शेतीमध्ये स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली आहे. वर्ष 2017 मध्ये त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून ते स्ट्रॉबेरी पिकातून मोठया प्रमाणात उत्पन्न मिळवत आहे. त्याच्या 0.25 हेक्टर रानातून त्यांना जवळपास 5 टन स्ट्रॉबेरीचे उत्पादन मिळते. त्यांना बाजारात आपल्या या स्ट्रॉबेरीस संपूर्ण हंगामात सरासरी 100 ते 200 रुपये प्रति किलो दरम्यान दर मिळत असल्याचे ते सांगतात.

किती मिळतोय नफा?

याशिवाय सध्या त्यांनी आपल्या शेतीमध्ये बटाटा, वाल आणि काही हिरव्या भाज्यांसह धने लागवड देखील केली आहे. त्यांना बटाटा पिकातून एकरी 140 क्विंटल, आणि उर्वरित भाज्यांचे एकरी 50-55 क्विंटल उत्पादन मिळवले आहे. याशिवाय या पिकांच्या शेतामध्ये त्यांनी धने लागवड देखील केलेली आहे. त्यामुळे एका हेक्टर शेतीमध्ये बाजारभावात चढ-उतार धरून, सर्व पिकांच्या माध्यमातून वार्षिक 8 लाखांचा निव्वळ नफा मिळवत असल्याचे शेतकरी आशुतोष पांडे सांगतात. भाजीपाला आणि फळ पिकांना बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. ज्यामुळे आपण या पिकांचा मार्ग निवडल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!