Success Story : दहा गुंठ्यात, दहा लाखांची कमाई; पुण्यातील महिला शेतकऱ्याची कमाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कधीकाळी आपल्या देशाला पुरुषप्रधान देश म्हटले जायचे. मात्र आज देशातील असे कोणतेही क्षेत्र (Success Story) नाही आहे ज्यात महिला मागे आहेत. शेती क्षेत्रामध्ये आज महिला आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत चांगली कमाई करत आहे. आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अशाच एका प्रगतशील शेतकरी महिलेची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. सीमा जाधव असे त्यांचे नाव असून, त्यांनी केवळ दहा गुंठे शेत जमिनीत स्ट्रॉबेरी लागवडीतून दहा लाखांची कमाई करण्याची किमया करून दाखवली आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंबळी गावात प्रगतिशील शेतकरी सीमा जाधव (Success Story) आणि त्यांचे पती चंद्रकांत जाधव यांनी हा स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला आहे. अल्प-भूधारक शेतकरी असल्याने त्या भाजीपाला पिकांची आलटून-पालटून शेती करत असतात. त्यांच्या उत्पादन घेण्याच्या पद्धतींमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात यावर्षी त्यांनी आपल्या शेतात काहीतरी नवीन प्रयोग करण्याचे ठरवले. त्यासाठी महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची भिला जातीची पाच हजार रोपे उपलब्ध केली. या रोपांची त्यांनी ऑक्टोबर महिन्यात दहा गुंठे जमिनीत सेंद्रिय पद्धतीने लागवड केली आहे. ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून त्यांनी स्ट्रॉबेरी ही लागवड केली आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने लागवड केल्याने त्यांच्या उत्पादन खर्चात घट झाल्याचे त्या सांगतात. त्यांना दहा गुंठे स्ट्रॉबेरी लागवडीसाठी एक लाख रुपये इतका उत्पादन खर्च आला आहे.

शेतकरी ग्राहक थेट विक्री (Success Story Of Strawberry Woman Farmer)

ऑक्टोबर महिन्यात लागवड केल्यानंतर दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीत त्यांचे स्ट्रॉबेरी काढणीला आले असून, सध्या स्ट्रॉबेरीची काढणी ही अंतिम टप्प्यात आहे. सीमाताईंनी आपली उत्पादित स्ट्रॉबेरी व्यापाऱ्याला न देता थेट ग्राहकांना विक्री करण्यास पसंती दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात प्रभावी विपणन कौशल्याच्या माध्यमातून त्या प्रत्येक सोसायटीत आपली ही स्ट्रॉबेरी विक्रीस पाठवत आहे.

किती मिळतोय दर?

शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री केल्याने त्यांच्या सेंद्रिय स्ट्रॉबेरीला प्रति किलो चारशे रुपये रुपयांचा दर मिळत आहे. आतापर्यत मिळालेले उत्पादन आणि मागे शिल्लक असलेल्या उत्पादनातून त्यांना दहा गुंठ्यात जवळपास अडीच हजार किलो स्ट्रॉबेरी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. अर्थात 2500×400= 10,00,000 रुपये त्यांना 10 गुंठे स्ट्रॉबेरी पिकापासून उत्पन्न होण्याचा अंदाज आहे. त्यातून एक लाख रुपये खर्च वजा जाता 9 लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. सीमा जाधव या केवळ बारावी पास असून, त्यांच्या या स्ट्रॉबेरी शेतीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. त्यामुळे आता केवळ 10 गुंठ्यात आणि तेही अडीच ते तीन महिन्यांच्या काळात 9 लाखांची कमाई करणाऱ्या सीमाताई शेतीमध्ये येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी नक्कीच प्रेरणास्रोत ठरणार आहे.

error: Content is protected !!