Success Story : हेक्टरी 2758 क्विंटल ऊस उत्पादन; योग्य व्यवस्थापातून शेतकऱ्याची किमया!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात ऊस या पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील अनेक शेतकरी (Success Story) वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेत आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. ज्या शेतकऱ्याने उसाचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया करून दाखवली आहे. यूपीतील हरदोई जिल्ह्यातील शेतकरी नागेंद्र सिंह यांनी हेक्टरी 2758 क्विंटल उसाचे उत्पादन घेतले असून, जे उत्तर प्रदेश राज्यातील आजपर्यंतचे विक्रमी उत्पादन (Success Story) मानले गेले आहे.

शेतकरी नागेंद्र सिंह हे गेल्या 20 वर्षांपासून ऊस शेती करत असून, वर्ष 2023 त्यांच्यासाठी खूपच फलदायी (Success Story) ठरले आहे. नागेंद्र यांनी योग्य बियाणे आणि योग्य जमिनीच्या वापरातून ही किमया केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही ऊस लागवडीपूर्वी शेताची चांगली मशागत करून घेतल्यास तसेच योग्य बेण्याची निवड केल्यास तुम्हाला त्याचवेळी 90 टक्के उत्पादन मिळण्याची गॅरंटी असते. त्यांनी याच मंत्राचा वापर करत जुलै 2022 मध्ये CO-0238 या जातीच्या बेण्याची निवड करत ऊस लागवड केली. आता त्यांना त्या लागवडीचे गोड रसाळ फळ चाखायला मिळाले आहे. त्यांना यावर्षी विक्रमी हेक्टरी 2758 क्विंटल उसाचे उत्पादन मिळाले आहे.

कोणत्या प्रजातीची निवड? (Success Story Of Sugarcane Farmer)

शेतकरी नागेंद्र यांनी CO-0238 या उसाच्या जातीची निवड केलेली होती. मात्र या प्रजातीच्या उसावर सुरुवातीच्या काळात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. ज्यासाठी त्यांनी कृषी विभागाची मदत घेत प्रभावी नियंत्रण मिळवले. या प्रजातीच्या उसावर लाल कैंसर रोग देखील बळावला होता. हा रोग प्रामुख्याने एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरतो. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांच्या शेतांमधून या रोगाच्या प्रादुर्भाव होऊन नये, यासाठी नागेंद्र यांनी शेताच्या चहूबाजूने अन्य प्रजातीच्या उसाची लागवड केली होती. त्यामुळे त्यांना अधिक उत्पादन मिळवण्यासह कीड व्यवस्थापन करण्यातही यश मिळाले.

माती परीक्षण गरजेचे

शेतकरी नागेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, शेतकरी मातीचे परीक्षण न करता सतत युरिया आणि डीएपी टाकत असतात. मात्र आपण माती परीक्षण करत मार्गदर्शनातून केवळ आवश्यक तीच खते उसाला दिली पाहिजे. ज्यामुळे उत्पादनात वाढ होऊन, उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. याशिवाय त्यांनी ऊस पीक घेण्याअगोदर शेतात राणशेवरा पेरला होता. ज्यामुळे मातीमध्ये सेंद्रिय घटक तयार होऊन, त्यांना खतांचा कमी वापर करावा लागला. राणशेवऱ्यामुळे अधिक उत्पादन मिळण्यास मदत झाली.

हेक्टरी 2758 क्विंटल उत्पादन

योग्य व्यवस्थापनातून जुलै 2022 मध्ये लागवड केलेल्या उसाद्वारे नागेंद्र यांनी प्रति हेक्टरी 2758 क्विंटल उत्पादन मिळवले आहे. नागेंद्र यांच्या उसाची तोड झाल्यानंतर कारखान्यांनाकडून त्यांच्या एकत्रित उसाचे वजन जाहीर करण्यात आले. त्यात कारखान्याकडून हेक्टरी 2758 क्विंटल ऊस झाल्याचे नमूद करण्यात आले आहेत. ज्यामुळे नागेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशातील आतापर्यंतचे सर्वाधिक ऊस उत्पादन घेणारे शेतकरी ठरले आहे.

error: Content is protected !!