Success Story : …अन् शिक्षक बंधू झाले आधुनिक शेतकरी; सीताफळ लागवडीतून भरघोस कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दुष्काळी भागात पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची (Success Story) जोड मिळाली तर तीच शेती अधिक शाश्वत आणि व्यावसायिक पातळीवर करणे शक्य आहे. त्यास सध्याच्या डिजिटल युगाचा हातभार लागला तर हीच शेती अधिक सुखकर होते. हेच बीड जिल्ह्यातील बंडू व राजेंद्र जाधव या शिक्षक असलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. या दोन्ही भावंडांनी सीताफळाची लागवड (Success Story) करत ते तेलंगणातील बाजारपेठेपर्यंत पाठवत चांगला नफा मिळवत आहेत.

मराठवाडा म्हटले की पहिले डोळ्यासमोर चित्र उभे राहते. ते दुष्काळी भाग आणि टँकरने पाणीपुरवठा होणारा (Success Story) परिसर अशीच काहीशी ओळख मराठवाड्याची आहे. मात्र याच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील बी.एस्सी.बी.एड., एम.ए.बी.एड शिक्षण घेतलेल्या बंडू व राजेंद्र जाधव या दोन भावांनी पारंपरिक शेतीला मूठमाती देत आधुनिक पद्धतीने सीताफळाची शेती करण्याचे निर्धार केला. यासाठी त्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत, वर्ष 2018 मध्ये सोलापूर येथून सीताफळाची 600 रोपे उपलब्ध केली. ही रोपे या दोन भावांनी दीड एकरात चांगली मशागत करून, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून लावली. यासाठी त्यांनी 6 बाय 12 फूट अंतर निश्चित केले. दीड एकरात सीताफळ बागेसाठी त्यांना औषधे, फवारणी, मजुरी असा दीड लाख रूपये खर्च आला आहे.

45 रुपये किलो दर (Success Story Of Sitafal Cultivation)

बंडू व राजेंद्र जाधव यांच्या याच मेहनतीच्या जोरावर आज बंडू व राजेंद्र जाधव या शिक्षक असलेल्या शेतकऱ्यांची बाग चांगलीच बहरात आली आहे. यंदा त्यांनी फळे धरल्यामुळे बागेत मोठ्या प्रमाणात सीताफळे लगडली आहेत. सीताफळाची मागणी वाढली असून, तेलंगणामध्ये हे बंधू आपली सीताफळे विक्रीसाठी पाठवत आहेत. तेलंगणातील बाजारपेठेत त्यांच्या सीताफळास 45 रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. यातून साधारण साडेतीन लाख रूपये उत्पन्न मिळेल. अशी अपेक्षा दोघा भावांना आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

आधुनिक शेतीचे करण्याचे आवाहन

फळबाग शेती करताना सीताफळासोबतच या दोन भावांनी दोन एकरात (Success Story) जांभूळ, दीड एकरात पेरू तर एक एकरात शेवंतीची लागवड केली आहे. यातून आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळाला असल्याने आता आधुनिक शेतीकडे आम्ही लक्ष देत आहोत. यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य मेहनत करत असल्याचेही जाधव यांनी सांगितले. तरुणांनीही आधुनिक पद्धतीचा अवलंब करत शेतीकडे वळले पाहिजे, असे आवाहन या जाधव बंधूंनी तरुण शेतकऱ्यांना केले आहे.

error: Content is protected !!