Success Story : डाळिंबाच्या शेतीतून शेतकऱ्याने कमावले 80 लाख रुपये, कस केलं नियोजन? वाचा सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : सध्या अनेकजण शेती व्यवसाय करत आहेत. मात्र सध्याच्या घडीला शेती परवडत नसल्याचे देखील अनेक शेतकरी बोलत आहेत. शेतीत फायदा नाही, असे बहुतेकांचे म्हणणे आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न खूपच कमी झाले आहे. अनेक वेळा योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. पण मेहनत आणि नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर शेती केली यामधून चांगले उत्पन्न मिळते. राजस्थानमधील शेतकऱ्याने मेहनतीच्या जोरावर चांगले उत्पन्न घेतले आहे. चलातर मग जाणून घेऊया शेतकऱ्यांबद्दल अधिकची माहिती.

राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील भीमडा गावातील जेठाराम कोडेचा या शेतकऱ्याने डाळिंबाच्या शेतीतून चांगला नफा कमावला आहे. पूर्वी ते पारंपारिक पिके घेत असत, मात्र यातून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते.त्यानंतर त्यांनी बागकाम सुरू केले. 2016 पासून ते डाळिंबाची शेती करत असून डाळिंबामुळे त्यांचे नशीबच बदलेल आहे. त्यांच्या शेतात पिकवलेले डाळिंब महाराष्ट्र, कलकत्ता आणि बांगलादेशला पुरवले जात आहे.

वर्षभरात लाखो रुपयांची कमाई

या शेतकऱ्याने डाळिंब शेतीतून लाखो रुपयांची कामे केली आहे. विशेष बाब म्हणजे 2016 मध्ये जेठाराम यांनी 15 लाखांचे कर्ज घेऊन स्टार्टअप म्हणून डाळिंबाची लागवड सुरू केली. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील नाशिक येथून डाळिंबाच्या प्रगत जातीची ४ हजार रोपे मागवली होती. यानंतर कोडेचा यांनी मागे वळून पाहिले नाही. आणि आता डाळिंब शेतीतून लाखो रुपये कमावतात.

महत्वाची गोष्ट म्हणजे जेठाराम कोडेचा यांचे शिक्षण झालेले नाही. ते अशिक्षित थंब प्रिंट शेतकरी आहेत. असे असूनही त्यांनी मोठ्या उद्योगपतींना मागे टाकले आहे. ते त्यांच्या शेतात भगवा, सिंदूरी या डाळिंबाच्या सुधारित जातींचे उत्पादन घेत आहेत. जेठाराम यांनी ४५ बिघे जमिनीत डाळिंबाची लागवड केली आहे. एका झाडापासून 25 किलो डाळिंब तयार होते.

जेठाराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, डाळिंबाची लागवड सुरू केल्यानंतर एक वर्षानंतर त्यांना उत्पन्न येण्यास सुरवात झाली. दुसऱ्या वर्षी डाळिंब विकून सात लाख रुपये कमावले. त्याचप्रमाणे तिसऱ्या वर्षी 15 लाख रुपये, चौथ्या वर्षी 25 लाख रुपये आणि पाचव्या वर्षी डाळिंबातून 35 लाख रुपये कमावले. आतापर्यंत डाळिंब विकून त्यांनी 80 लाख रुपये कमावल्याचे ते सांगतात. त्यामुळे त्यांच्याकडे एक आर्दश शेतकरी म्हणून पहिले जाते.

error: Content is protected !!