Success Story : टोमॅटो पिकातून शेतकऱ्याने साधली प्रगती; एका बिघ्यात वार्षिक 3 ते 4 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाजीपाला पिकांना (Success Story) मोठे महत्व प्राप्त होते. विशेष म्हणजे पाण्याची कमतरता असल्याने, भाजीपाला पिकांची आवकही कमी असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादित मालाला दरही चांगला मिळतो. उन्हाळ्यात प्रामुख्याने फळ पिकांसह भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्यावर शेतकरी अधिक भर देतात. आज आपण अशाच एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे टोमॅटो लागवडीतून वार्षिक 3 ते 4 लाखांची कमाई करत आहे. विशेष म्हणजे पारंपरिक पिकांऐवजी आधुनिक पद्धतीने टोमॅटो लागवडीतून (Success Story) त्यांना अनेक पटीने अधिक नफा मिळत असल्याचे ते सांगतात.

पारंपारिक पिकांना फाटा (Success Story Of Tomato Farmer)

बबलू कुमार असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील चितवानिया गावचे रहिवासी आहे. बबलू कुमार यापूर्वी पारंपारीक पद्धतीने शेती करत होते. मात्र, पारंपारिक पिकांमधुन त्यांना अपेक्षित उत्पन्न (Success Story) मिळत नव्हते. पारंपारिक पिकांमधुन कधी-कधी तर त्यांना उत्पादन खर्च मिळणेही अवघड जात होते. ज्यामुळे त्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीमध्ये नवीन काहीतरी पिकांची लागवड करण्याचा निर्धार केला. ज्यातून ते टोमॅटो लागवडीकडे वळले. टोमॅटोला बाजारात नेहमीच मागणी असते. ज्यामुळे आपण मागील पाच वर्षांपासून टोमॅटो शेती करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी बबलू कुमार यांनी सांगितले आहे की, आपण दरवर्षी टोमॅटो रोपांची नर्सरी घरीच तयार करतो. जवळपास महिनाभर नर्सरीमध्ये (Success Story) रोपे मोठी केले जातात. ज्यानंतर शेतीमध्ये आपण त्याचे रोपण करतो. त्यानंतर 2 ते 3 महिन्यांमध्ये फळे तोडणीला येतात. एका कॅरेटमध्ये जवळपास 25 ते 30 किलो टोमॅटो मावतात. सध्याच्या घडीला आपल्याला 600 ते 700 रुपये प्रति कॅरेटचा दर मिळत आहे. ज्यातून आपल्याला एक बिघा शेतीमधून जवळपास 3 ते 4 लाखांची कमाई सहज होत असल्याचे शेतकरी बबलू कुमार सांगतात.

किती आला खर्च?

शेतकरी बबलू कुमार सांगतात, मागील पाच वर्षांपासून आपण टोमॅटो पिकाची शेती करत आहे. दरवर्षी जवळपास एक बिघा जमिनीमध्ये आपण टोमॅटोची लागवड करतो. बाजारभाव चांगला मिळाल्यास अन्य पिकांच्या तुलनेत टोमॅटो पिकातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे ते सांगतात. दरवर्षी एका बिघा जमिनीमध्ये आपल्याला रोपे तयार करण्यासाठी, त्यासाठी औषधे, खते, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन असा सर्व मिळून ८० ते ९० हजार रुपयांचा खर्च होतो. ज्यातून आपल्याला वार्षिक 3 ते 4 निव्वळ नफा होत असल्याचे ते सांगतात.

आधुनिक शेतीकडे वळण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांची शेती करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. पारंपारिक पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक पटीने अधिक नफा मिळतो. पारंपारिक पिकांमध्ये अपेक्षित फायदा नसतो. याउलट टोमॅटोसारख्या नगदी पिकांना योग्य दर मिळाल्यास, शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने पिकांच्या लागवडीकडे वळणे आवश्यक आहे. असे आवाहन त्यांनी शेवटी शेतकऱ्यांना केले आहे.

error: Content is protected !!