Success Story : शिक्षण घेता-घेता फुलवली टरबूज शेती; दोन मित्रांची अल्पावधीत भरघोस कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या नवशिक्षित तरुण शेती क्षेत्रामध्ये (Success Story) पाय ठेवत आहे. इतकेच नाही तर अधिकचा नफा मिळवून देणारी पिके घेऊन हे तरुण आपली आर्थिक प्रगती साधत आहेत. आज आपण अशाच कृषी क्षेत्रातील पदवीचे शिक्षण घेत असलेल्या दोन तरुणांच्या टरबूज शेतीची यशोगाथा पाहणार आहोत. विशेष म्हणजे या दोघांनी हाताशी असलेले जपून ठेवलेले पैसे आणि काही कर्ज उभारून ही टरबूज लागवड केली. पावणेदोन बिघे रानातील त्यांच्या या टरबूज शेतीतून त्यांनी लाखोंची कमाई (Success Story) केली आहे.

वाट्याने घेतले वावर (Success Story Of Two Agriculture Student)

प्रीतम राजेंद्र चव्हाण आणि प्रथमेश पांडुरंग आडसूळ असे या तरुणांचे नाव आहे. यातील प्रीतम हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तर प्रथमेश हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील आहे. विशेष म्हणजे या दोघही तरुणांनी घरच्यांना न सांगता, हे टरबुजाचे पीक घेतले आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना, वाट्याने शेती करत हे टरबूज पीक घेतले आहे. त्यांनी आपल्या या पावणे दोन बिघे रानात एकही मजूर न लावता, स्वतः मेहनत करून हे पीक घेतले आहे.

किती मिळतोय दर?

प्रीतम आणि प्रथमेश या दोघांनी घरच्यांकडून पैसे न घेता हे शिक्षण (Success Story) करता यावे. यासाठी टरबुजाची पीक घेत, तळसंदे येथे वाट्याने शेती केली. आणि त्यात त्यांना यश देखील मिळाले आहे. सध्याच्या घडीला टरबुजाला प्रति किलो 13 रुपये दर मिळत आहे. त्यांना एकूण आपल्या पावणे दोन बिघे जमिनीतून ३० टन माल निघण्याची अपेक्षा आहे. सध्या त्यांच्या माल काढणीला आला असून, बाजारभावानुसार त्यांना सर्व मालाचे ३ ते ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचे दोघेही मित्र सांगतात.

मजूर न लावता, स्वतः घेतली मेहनत

कृषी विषयातील पदवीच्या चौथ्या वर्षाला असलेल्या या दोघाही मित्रांनी आपले शिक्षण घेतलेले ज्ञान शेतीमध्ये प्रात्यक्षिक स्वरूपात लागू करण्यासाठी हा प्रयोग केल्याचे हे दोघेही मित्र सांगतात. यासाठी त्यांनी शुगर फॅक्टरी नावाच्या टरबूज जातीची केली होती. या जातीची लागवड करताना त्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करत ठिबकची उभारणी केली. ज्यामुळे त्यांना कष्ट कमी होऊन, रात्री अपरात्री काही कालावधीसाठी टरबूज पिकाला मोटर चालू करत पाणी देणे सोपे गेले. विशेष म्हणजे त्यांनी हे टरबूज पीक घेताना कॉलेजला एकही दिवस गैरहजेरी लावली नाही. आणि टरबूज पिकाचे काम देखील मजूर न लावता केले. ज्यामुळे त्यांना एकाच वेळी कृषी शिक्षण आणि त्यातील प्रात्यक्षिकाचा अनुभव घेता आल्याचे दोघेही मित्र सांगतात.

error: Content is protected !!