हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या रासायनिक शेतीऐवजी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती (Success Story) करण्याकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. रासायनिक खतांच्या वापरातून देशातील अन्नधान्य उत्पादनात भलेही वाढ झाली असेल मात्र मातीचा पोत पूर्णतः बिघडलेला आहे. त्यामुळे सध्या राज्यात अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीची वाट धरत आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील शेतकरी शेखर त्रिपाठी यांनीही अशीच सेंद्रिय शेतीची वाट धरली असून, त्यांनी आपल्या 10 एकरात सेंद्रिय शेतीचे एक मॉडेल विकसित केले आहे. ज्याद्वारे तुम्हालाही सेंद्रिय शेती (Success Story) करण्यास मदत होऊ शकते.
सेंद्रिय शेती म्हटले अनेक शेतकरी गायीचे शेण आणि गोमूत्र यापासून जीवामृत आणि बीजामृत तयार करून शेती करतात. मात्र रायबरेली येथील शेतकरी शेखर त्रिपाठी यांनी आपल्या 10 एकर जमिनीमध्ये सेंद्रिय शेतीचे असे मॉडेल विकसित केले आहे. ज्याबाबत त्यांचे सरकारकडूनही कौतुक केले जात आहे. 2017 मध्ये त्यांनी आपल्या 10 एकरात समृद्धी ऍग्रो फार्म (Success Story) तयार केले आहे. ज्यामध्ये त्यांच्याकडे सध्या 60 हून अधिक गायी आहेत. त्रिपाठी यांनी दूध व्यवसायाला सेंद्रिय शेतीची जोड दिली आहे. यासाठी त्यांनी एका प्राकृतिक तलावाची निर्मिती केली आहे. हा तलाव आणि गायींचे फार्म यात काही अंतर ठेऊन त्यांनी ते एकमेकांना मोठ्या सिंमेंटच्या पाटाने जोडले आहे आहे. ज्यामुळे गायींचे मलमूत्र पाण्यासोबत थेट या प्राकृतिक तलावात जाते. हेच पाणी ते आपल्या शेतात पिकांना नियमित वापरतात. हे पाणी पिकांना अमृतासमान असल्याचे ते सांगतात. या मलमूत्र आधारित पाण्याचा वापरामुळे त्यांच्या शेती उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.
उत्पादन खर्चात बचत (Success Story of Organic-Dairy Farming)
समृद्धी ऍग्रो फार्मचे संचालक शेखर त्रिपाठी यांनी हा प्राकृतिक तलाव (Success Story) पाण्यासाठी निर्माण केला होता. मात्र त्यांच्या मनात गायींचे शेण आणि मूत्र यापासून चमत्कारिक द्रव स्वरूपातील खत बनवण्याचा विचार आला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून ते आपल्या शेतीत हा प्रयोग करत आहेत. ज्यामुळे शेती उत्पादनात वाढच नाही झाली तर त्यांच्या जमिनीचा पोत सुधारण्यासही मदत झाली आहे. ज्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत झाली असून, त्यांना आपल्या शेतामध्ये कोणत्याही रासायनिक खतावर खर्च करावा लागत नाही. याच तलावातील पाण्याच्या साहाय्याने ते आपल्या शेतीला पाणी देत आहे. तलावाच्या तळाला साचलेले शेणखत विघटनानंतर पुन्हा ते आपल्या जमिनीत वापरत आहे.
सेंद्रिय अन्नधान्याला विशेष मागणी
शेखर त्रिपाठी हे त्यांच्या फार्मवर येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासह सर्व प्रकारची मदत करतात. त्रिपाठी यांचे वय 47 इतके आहे. मात्र त्यांची शेतीत काम करण्याची वृत्ती एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी आहे. ते उच्चशिक्षित असून, शेतीत आवड निर्माण झाल्याने त्यांनी रायबरेलीमधील सहजौरा गावात 10 एकर माळरान जमीन विकत घेतली. यावर त्यांनी आपला हा समृद्धी फार्म उभा केला आहे. त्यांच्या प्राकृतिक तलावात साचलेल्या शेणखतापासून (Success Story) अलीकडेच त्यांनी तीन प्रकारची खते निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. ही खते त्यांनी मागणीनुसार शेतकऱ्यांना विक्री करण्यास सुरुवात केल्याचेही ते सांगतात. याशिवाय त्यांच्या शेतात उत्पादित होणाऱ्या अन्नद्यान्याला विशेष मागणी असून, त्यांना बाजारात चांगला दर मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. इतकेच नाही तर 60 गायींच्या दररोजच्या दूध उत्पादनातूनही त्यांना मोठी कमाई होत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीला दुग्धव्यवसायाच्या जोडीतून उभारलेले हे मॉडेल शेती क्षेत्रामध्ये नव्याने येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.