Success Story : 25 हजार गुंतवणुकीतून 6 लाखांचा नफा; भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्याची कमाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या शेतकरी नवनवीन पिकांची लागवड (Success Story) करत आहेत. यामध्ये भाजीपाला पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे सुयोग्य नियोजन करत शेतकरी या भाजीपाला पिकांमधून मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळवत आहेत. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी केवळ 25 हजारांची गुंतवणूक करून, अल्पावधीतच 6 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. वर्षभरात बाजारभावाचा अंदाज घेऊन, त्या-त्या काळात संबंधित भाजीपाला पिकांची लागवड करून, आपण भरघोस नफा (Success Story) मिळवत असल्याचे या शेतकऱ्याने म्हटले आहे.

कोणत्या भाजीपाल्याची लागवड? (Success Story Of Vegetable Cultivation)

संजय राजपूत असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील दहीगंवा गावचे रहिवासी (Success Story) आहेत. शेतकरी संजय राजपूत सांगतात, ते आपल्या शेतात बाजाराचा आढावा घेऊन, भाजीपाला पिकांची लागवड करतात. बाजारात भाजीपाला पिकांना नेहमीच मोठी मागणी असते. ज्यामुळे आपल्याला कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळत आहे. ते सांगतात आपण मागील आठ वर्षांपासून भाजीपाला पिकांची शेती करतो आहे. सध्या आपल्या 2 एकर शेतामध्ये टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर या भाजीपाला पिकांची लागवड केली आहे.

किती होते वार्षिक कमाई

शेतकरी संजय राजपूत सांगतात, भाजीपाला पिकांची शेती करताना प्रामुख्याने औषधे सोडली तर फारसा खर्च येत नाही. एकदा सर्व ठिबक व्यवस्था उभारल्यानंतर वार्षिक केवळ 20 ते 25 हजारांचा उत्पादन खर्च होतो. तर त्यातून बाजारभावात होणारे चढ-उतार लक्षात घेऊन, आपल्याला वार्षिक 5 ते 6 लाख रुपयांची कमाई हमखास होत असल्याचे ते सांगतात. आपण आपला सर्व भाजीपाला हा रायबरेली, लखनऊ आणि बाराबंकी या जिल्ह्यांच्या बाजार समित्यांमध्ये पाठवत असल्याचे ते सांगतात.

भाजीपाला पिकांसाठी काळजी खूप महत्वाची

शेतकरी संजय राजपूत सांगतात, शेतीमध्ये चांगले पीक येण्यासाठी पिकांचे आरोग्य उत्तम ठेवणे खूप गरजेचे असते. यासाठी मातीमध्ये योग्य प्रमाणात जैविक घटक असणे खूप गरजेचे असते. याशिवाय भाजीपाल्याची रोपे तयार करताना, शक्यतो संपूर्ण पाण्याचा निचरा होईल. अशी जागा निवडावी. याशिवाय भाजीपाला पिके घेताना त्यावर होणार किडीचा प्रादुर्भाव, आणि रोगांवर नियंत्रण मिळवणे देखील तितकेच महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उन्हाळी हंगामात काकडीचे पीक

संजय राजपूत सांगतात, भाजीपाला पिके घेताना पाणी नियोजन खूप महत्वाचे असते. कारण उन्हाळी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांना पाण्याचे सूक्ष्म नियोजन करणे खूप गरजेचे असते. कारण या पिकांना नेहमीच अधिकचा दर मिळतो. त्यामुळे आपण उन्हाळ्यात प्रामुख्याने काकडीची लागवड करतो. ज्यातून आपल्याला चांगला फायदा मिळतो. उन्हाळ्यात लग्नसराईचा सिझन असल्याने लग्न समारंभात सॅलड बनवण्यासाठी काकडीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. ज्यामुळे उन्हाळी हंगामात काकडीला खूप मागणी असते.

error: Content is protected !!