Success Story : पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला, फुलशेती; शेतकऱ्याची मासिक अडीच लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या आधुनिक पद्धतीने (Success Story) शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शेतकरी भाजीपाला आणि फुले यांची लागवड करत, तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पारंपारिक पिकांपेक्षा, आधुनिक पद्धतीने घेतलेल्या या पिकांमधून अनेक पटीने अधिक उत्पन्न मिळत आहे. आज आपण अशाच एका प्रगतिशील शेतकऱ्यांची यशोगाथा पाहणार आहोत. जे पॉलीहाऊसच्या माध्यमातून भाजीपाला आणि फुलांच्या लागवडीतून (Success Story) लाखोंची कमाई करत आहे.

आधुनिक शेतीचा निवडला मार्ग (Success Story Vegetables, Floriculture In Polyhouse)

हिमांशु त्यागी असे या प्रगतिशील शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील बिजनोर जिल्ह्याचे (Success Story) रहिवासी आहे. विशेष म्हणजे त्यांनी हिमांशु त्यागी यांनी १० वर्ष नोकरी केली. त्यानंतर त्यांना नोकरीत मन रमत नसल्याने त्यांनी २०१३ साली आपल्या नोकरीला रामराम ठोकत त्यांनी शेतीची वाट धरली. दहा वर्षांपूर्वी त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी २०१५ मध्ये पॉलीहाऊसची उभारणी केली. त्यातून ते सध्या भाजीपाला आणि फुलांच्या लागवडीतून मासिक अडीच लाखांची कमाई करत आहे.

कोणती पिके घेतात?

शेतकरी हिमांशू त्यागी यांनी सध्या आपल्या पॉलीहाऊसमध्ये काकडी, रंगबेरंगी शिमला मिरची, डच प्रजातीचा गुलाब, जिप्सी फुल यांसारख्या अनेक पिकांची लागवड (Success Story) केली आहे. याशिवाय त्यांनी शेवंती, गेलार्डिया आणि झेंडू अशी सजावटीची फुले देखील लावली आहे. यामध्ये ते हवामान, बाजारभावाचा अंदाज घेऊन काकडी आणि रंगबेरंगी शिमला मिरची यांची लागवड करतात. तर फुलांची शेती ही बाराही महिने चालणारी शेती असल्याचे ते सांगतात. हिमांशू त्यांगीं सांगतात, आपण १७ बिघे जमिनीत पॉलीहाऊस आणि ठिबक सिंचन प्रणालीची उभारणी केली असून, त्यासाठी आपल्याला सरकारी अनुदान प्राप्त झाल्याने होणारा खर्च कमी झाला आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी हिमांशू त्यागी सांगतात, 2013 पूर्वी बंगलोरमध्ये नोकरी करत होतो. तेव्हा पॉलीहाऊस तंत्रज्ञान नव्याने विकसित होते. त्यामुळे आपणही गावाकडे येऊन आधुनिक शेती करण्याचा निर्धार पक्का केला. गेल्या दहा वर्षांपासून ते पॉलीहाऊसच्या माध्यमातून शेती करत आहेत. सध्या त्यांच्याकडे १४ लोक कायमस्वरूपी काम करत आहे. ते आपल्याकडे उत्पादित माल जयपूर, जम्मू-काश्मीर, गुजरात, लखनऊ या ठिकाणी थेट विक्री करतात. थेट विक्री करण्यामुळे त्यांना अधिकचा नफा मिळत असल्याचे ते सांगतात. सध्या त्यांना आपल्या सर्व भाजीपाला आणि फुल शेतीतून एकत्रितपणे १७ बिघ्यात मासिक अडीच लाखांची कमाई होता असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!