Success Story : यूट्यूबवर पाहून केली ड्रॅगन फ्रूटची शेती आता कमावतोय लाखो रुपये; वाचा तरुणाची यशोगाथा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : सध्या तरुणवर्ग चांगलं शिक्षण घेऊन देखील शेती करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबर आता बिहारमधील सुशिक्षित तरुण देखील शेतीत रस घेत आहेत. या तरुणांचा कृषी क्षेत्रात प्रवेश झाल्याने शेती क्षेत्रात नवी क्रांती झाली आहे. तरुणाईला पाहून पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनीही फळबाग लागवडीमध्ये रस घेण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे बिहारमधील शेतकरी आता परदेशी फळे आणि भाजीपाल्याचीही लागवड करत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून, त्यामुळे ते चांगले जीवन जगत आहेत. दरम्यान आज आपण पूर्व चंपारण जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याबद्दल बोलणार आहोत, ज्याने ड्रॅगन फ्रूटची लागवड सुरू केली आहे. आणि यातून चांगला नफा देखील कमावत आहे.

2 लाख 6 हजार रुपयांची कमाई

रितेशकुमार ठाकूर असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. या तरुणाने अर्धा एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रूटचे पीक घेतले आहे. तरुणीनं शेतात दोन जातींची लागवड केली आहे. सध्या महिन्याभरात ३० किलो ड्रॅगन फ्रूट विकत असल्याची माहिती तरुणाने दिली आहे. बाजारात एक किलो ड्रॅगन फ्रूटची किंमत 600 रुपये आहे. म्हणजेच महिन्याभरात ड्रॅगन फ्रूट विकून 18 हजार रुपये कमावत आहेत. अशा प्रकारे वर्षभरात 2 लाख 6 हजार रुपयांचे उत्पन्न होत आहे. युवा शेतकरी रितेशकुमार ठाकूर येत्या काळात एक एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याचा विचार करत आहे.

यूट्यूबवरून घेतली माहिती

रितेश हा सुशिक्षित तरुण शेतकरी आहे. त्याने 2019 मध्ये ग्रॅज्युएशन केले. त्याच दरम्यान त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत घरची सर्व जबाबदारी त्याच्यावर आली त्यानंतर त्याने शेती करण्यास सुरवात केली आणि तो आपल्या काकासोबत शेती करू लागला. दरम्यान, तत्कालीन बीएचओ शशी भूषण यांनी त्यांना ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर रितेशने यूट्यूबवर ड्रॅगन फ्रूटची शेती कशी करायची हे शिकून घेतलं आणि शेती करायला सुरुवात केली. आणि सध्या तो लाखो रुपयांची कामे करत आहे.

error: Content is protected !!