Success Story : मिरची पिकात टरबुजाचे आंतरपीक; तीन महिन्यात शेतकऱ्याची 6 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस (Success Story) झाला. मराठवाड्यासह काही भागांमध्ये सध्या तर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील खामखेडा येथील शेतकरी दत्तू बोरसे यांनी हिरवी मिरचीच्या पिकातून आर्थिक प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे त्यांनी मिरची पिकात टरबुजाचे आंतरपीक घेतल्याने, कमी पाण्यात त्यांना दुहेरी फायदा झाला आहे. या दोन्ही पिकांच्या माध्यमातून अवघ्या तीन महिन्यांत शेतकरी दत्तू बोरसे यांनी सहा लाखांचे उत्पन्न (Success Story) मिळवले आहे.

मिरची पिकात टरबुजाचे आंतरपीक (Success Story Nashik Farmer)

शेतकरी दत्तू बोरसे यांनी जानेवारी महिन्यात आपल्या दीड एकर जमिनीत लाल मिरचीची लागवड (Success Story) केली. मात्र, यंदा उन्हाळ्यात पाण्याची परिस्थिती बिकट असल्याने, त्यांनी पाण्याचे सुयोग्य नियोजन केले. तसेच एक पीक घेण्याऐवजी त्यांनी हिरव्या मिरचीचे मुख्य पीक तर त्यात टरबुजाची लागवड केली. ज्यामुळे कमी पाण्यात, कमी उत्पादन खर्चात दुप्पट उत्पन्न मिळवणे शक्य झाले आहे. शेतकरी दत्तू बोरसे यांचा मुलगा तुषार हा कृषी पदवीधारक असून, त्याने याबाबत काटेकोरपणे नियोजन केले. तसेच ठिबक, मल्चिंगची व्यवस्था उभारली.

किती आला खर्च?

शेतकरी दत्तू बोरसे यांना आपल्या एक एकरातील मिरची लागवडीसाठी एकूण 60 हजारांचा खर्च आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये त्यांना हिरव्या मिरचीच्या 6 हजार रोपांसाठी आणि टरबूजाच्या साडेसहा हजार रोपांसाठी एकूण अठरा हजार रुपये खर्च आला आहे. तर मल्चिंग व ठिबकसाठी बारा हजार रुपये खर्च आणि शेणखत, रासायनिक खते, फवारणी यांच्यासाठी एकत्रिपणे 30 हजार रूपयांचा खर्च झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

किती मिळाले उत्पन्न?

शेतकरी दत्तू बोरसे यांच्या म्हणण्यानुसार, एक एकर क्षेत्रात त्यांना 20 टन टरबुजाचे उत्पादन मिळाले आहे. त्यास अकरा रुपये किलो दराने टरबूज दिल्याने यातून त्यांना दोन लाख वीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर मुख्य पीक असलेल्या मिरचीचा तोडा अजून सुरू झाला आहे. पहिल्या तोड्याला त्यांना 53 रूपये प्रति किलोचा सरासरी दर मिळाला असून, त्यातून त्यांना आतापर्यंत 80 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर त्यांना आपल्या मिरचीचे पिकाचे आणखी दीड ते दोन महिन्यांपर्यंत तीन ते चार तोडे होतील. त्यातून त्यांना आणखी यापुढे सरासरी 40 रूपये किलोचा बाजारभाव मिळाला तरी साडे तीन लाखांचे उत्पादन मिळणार आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!