Success Story : मिरची पिकातून महिलेने कमावले 25 लाख; विक्रमी 200 क्विंटल उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : झणझणीत मिरचीचा ठेचा महाराष्ट्राच्या शेती संस्कृतीची (Success Story) ओळख आहे. राज्यात खानदेश पट्ट्यात विशेष करून नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे पीक घेतले जाते. मात्र, अशातच आता एका शेतकरी महिलेने याच झणझणीत मिरचीच्या लागवडीतून केवळ काही महिन्यामध्ये 25 लाखांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी या मिरची पिकाच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर केला. ज्यामुळे त्यांना 200 क्विंटल इतके विक्रमी उत्पादन मिळवण्यास मदत झाली. आज आपण या शेतकरी महिलेच्या मिरची पिकाची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

पारंपारिक पिकांना फाटा (Success Story Woman Earns 25 Lakhs)

मनीषा पाटील असे या शेतकरी महिलेचे (Success Story) नाव असून, त्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या राजवड गावच्या रहिवासी आहेत. यापूर्वी त्या गहू, ज्वारी, कापूस या पारंपरिक पिकांच्या माध्यमातून शेती करत होत्या. मात्र, त्यातून त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने, नगदी पिकांचा मार्ग निवडला. यासाठी मिरची आणि खरबूज यांची निवड केली. त्यांनी आपले तीन एकर शेत लागवडीपूर्वी चांगले तयार करून घेतले. त्यानंतर बेड पाडून मल्चिंग पेपर अंथरून त्यांनी तीन एकरात मिरची व खरबुजाची लागवड केली.

शेणखताच्या वापरावर भर

शेतकरी मनीषा पाटील यांनी ही पिके घेताना शेणखताचा प्रभावी वापर केला. ज्यामुळे त्यांना सेंद्रिय कर्बामुळे अधिक उत्पादन मिळण्यास मदत झाली. त्यांनी मिरचीची पिकासाठी रासायनिक खतांचा अल्प वापर केला. तसेच दूध, अंडी आणि गोमूत्र या माध्यमातून फवारणी घेण्यावर भर दिला. ज्यामुळे त्यांना अधिकचे आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळण्यास मदत झाल्याचे त्या सांगतात. त्यांच्या या आधुनिक पद्धतीसह सेंद्रिय पद्धतीच्या वापरामुळे गावात त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे.

किती मिळाले उत्पादन

पारंपारिक पिकांना फाटा देत आधुनिकतेची कास धरत शेतकरी मनीषा पाटील यांनी केवळ पाचच महिन्यांमध्ये मिरची पिकातून चार तोड्यांमध्ये आतापर्यंत 200 क्विंटल उत्पादन मिळवले (Success Story) आहे. तर खरबूज या पिकातून त्यांना आतापर्यंत एकूण पंचवीस टन माल मिळाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी गावातील 10 महिलांना मिरची तोडणीसाठी रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. त्यांना मिरची आणि खरबूज पिकातून आतापर्यंत एकूण 25 लाखांची कमाई झाल्याचे त्या सांगतात.

error: Content is protected !!