Success Story : केशर आंबा लागवड; महिला शेतकरी मिळवतीये वार्षिक 40 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या महिला शेतीमध्ये (Success Story) मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहे. अनेक महिला शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत फळपिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहे. त्यातून त्यांना अधिकचा नफा देखील मिळत आहे. आज आपण उस्मानाबाद जिल्ह्यातील अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या 5 एकर माळरान जमिनीवर केशर आंब्याची बाग फुलवली आहे. यंदा त्यांना आतापर्यंत आंबा विक्रीतून 20 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. तर आणखी हंगामाच्या शेवटापर्यंत 20 ते 25 लाख असे एकूण 40 ते 45 लाखांचे उत्पन्न (Success Story) मिळणार असल्याचे त्या सांगतात.

वाढवली जमिनीची सुपीकता (Success Story of Mango Farming)

माजी सरपंच मंगलबाई बंडू गवळी असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी शिवारातील आपल्या शेतीमध्ये ही केशर आंबा बाग फुलवली (Success Story) आहे. त्यांनी गावचे सरपंच पद भूषविले आहे. आठ वर्षांपूर्वी मंगलबाई यांनी देवकुरुळी या ठिकाणी 5 एकर जमीन खरेदी केली. या जमिनीत त्यांनी धरणातील माती टाकून, सुपीकता वाढवली. त्यानंतर त्यांनी या जमिनीवर आंबा बाग उभी केली. यंदा अवकाळी पावसाने सातत्याने हजेरी लावली. त्यामुळे वातावरण चांगले नसतानाही चांगले उत्पादन मिळाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी मंगलबाई गवळी सांगतात, आपल्या आंबा बागेची सध्या तोडणी असून, आतापर्यंत आंब्याची निम्मी विरळणी झाली आहे. त्यातून आपल्याला आतापर्यंतच्या आंबा विक्रीसाठी प्रति किलोचा 100 रुपये दर मिळाला आहे. ज्याद्वारे आपल्याला एकूण 20 लाखांची कमाई मिळाली आहे. तर आंबा बागेची तोडणी सुरु असून आणखी 20 ते 25 लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे त्या सांगतात. परिणामी, त्यांना यावर्षीच्या एकूण हंगामात 5 एकरातील केशर आंब्याच्या लागवडीतून 40 ते 45 लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे त्या सांगतात.

पाण्याचे सुयोग्य नियोजन

शेतकरी मंगलबाई गवळी सांगतात, आपल्याला आंबा लागवडीपासून ते आता फळ मिळेपर्यंत पती बंडू गवळी आणि मुलगा हनुमंत गवळी यांची मोठी मदत झाली. तसेच आपण आंबा बागेसाठी पाण्याचे सुयोग्य नियोजन केले असून, आपल्या 5 एकर जमिनीत दोन विहिरी खोदल्या असून, दोन बोअरवेल देखील घेतले आहे. ज्यामुळे यंदाच्या दुष्काळी परिस्थितीतही आंबा बागेला पाण्याची पूर्तता होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!